तुम्हाला ठाऊक आहे का ‘सरकार3’ अन् ‘सेक्स सीन’चा संबंध?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:49 IST2016-10-19T15:49:40+5:302016-10-19T15:49:40+5:30
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘सरकार 3’ चांगलाच चर्चेत आहे. ‘सरकार’ फ्रेंचाइजीमधील या तिसºया भागातील स्टारकास्टचे पहिले लूक अलीकडेच ...
.jpg)
तुम्हाला ठाऊक आहे का ‘सरकार3’ अन् ‘सेक्स सीन’चा संबंध?
द ग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘सरकार 3’ चांगलाच चर्चेत आहे. ‘सरकार’ फ्रेंचाइजीमधील या तिसºया भागातील स्टारकास्टचे पहिले लूक अलीकडेच जारी झाले. ‘सरकार 3’मध्ये अमिताभ बच्चन एका आगळ्या-वेगळ्या अवतारात दिसणार आहे. अनेकांच्या मते, अमिताभ यांची यातील भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित आहे. पण असे अजिबात नाही. प्रत्यक्षात ‘सरकार 3’ व ‘सेक्स सीन’चा संबंध आहे. ‘सेक्स’नसते तर कदाचित ‘सरकार’ हा चित्रपट आणि त्याचे तीन सीक्वल बनलेच नसते. होय, ‘सरकार’ आणि ‘सेक्स’चा संबंध खुद्द राम गोपाल वर्मा यांनीच उघड केला आहे. त्यांच्या ‘गन्स अॅण्ड थाइज’ या पुस्तकात राम गोपाल वर्मा यांनी यावर एक प्रकरणच लिहिले आहे. ते या प्रकरणात लिहितात, ‘‘ मी सीनिअर इंटर्नमध्ये शिकत होतो. एकेदिवशी एका मित्राने मला ‘दी गॉडफादर’नावाचे एक पुस्तक माझ्या हातात ठेवले आणि पान क्रमांक २६ वरचा एक सेक्स सीन नक्की वाच, असे सांगून तो निघून गेला. त्यादिवशी मी अक्षरश: पळतच घरी गेला आणि गेल्या गेल्या २६ क्रमांकाचे पान वाचून काढले. ते पान वाचून पुस्तक बंद केले आणि अचानक माझे लक्ष मागच्या पानावर लिहिलेल्या ‘ब्लर्ब’मधील ‘माफिया’ या शब्दावर गेले. हा शब्द माझ्या यापूर्वी कधीही वाचनात आला नव्हता. काही करायला नाही, म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतले. पण जसे वाचायला घेतले तसा त्यात गढून गेलो. त्यातील भाषा, लेखकाची शैली, त्यातील पात्र अशा कितीतरी गोष्टी मला प्रभावित करून गेल्या. यानंतर मी चार पाचदा अघाशासारखे हे पुस्तक वाचले. एकदा वाचले की, हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायची इच्छा मला व्हायची. कारण प्रत्येकवेळी मला त्यात काही नवे सापडायचे. या पुस्तकावर चित्रपट बनवण्याचा विचार त्याचवेळी माझ्या डोक्यात चमकला. याच पुस्तकाने प्रभावित होऊन मी माझ्या अनेक चित्रपटाचे सीन्स चित्रीत केलेत.’’