अक्षयकुमारची ही बेस्ट फ्रेंड तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 16:35 IST2017-02-10T11:03:06+5:302017-02-10T16:35:20+5:30

खिलाडी अक्षयकुमार याची बॉलिवूडमधील त्या स्टार्ससोबत तुलना केली जाते ज्याची सर्वांसोबतच चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्याच्या मित्रांची यादी खूपच ...

Do you know Akshay Kumar's best friend? | अक्षयकुमारची ही बेस्ट फ्रेंड तुम्हाला माहीत आहे का?

अक्षयकुमारची ही बेस्ट फ्रेंड तुम्हाला माहीत आहे का?

लाडी अक्षयकुमार याची बॉलिवूडमधील त्या स्टार्ससोबत तुलना केली जाते ज्याची सर्वांसोबतच चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्याच्या मित्रांची यादी खूपच लांबलचक आहे. मात्र या सर्वांमध्ये तो एका व्यक्तीला सर्वाधिक क्लोज फ्रेंड समजतो, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून त्याची सासू डिंपल कपाडिया आहे. 

शुक्रवारी अक्षयचा ‘जॉली एलएलबी-२’ हा सिनेमा रिलिज झाला असून, यानिमित्त त्याने गुरुवारी लाइव्ह चॅटच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सबरोबर संवाद साधला. यावेळी जेव्हा त्याला एका फॅन्सने बॉलिवूडमधील त्याच्या सर्वात क्लोज फ्रेंडचे नाव विचारले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता डिंपल कपाडिया हे नाव घेतले. खरं तर अक्षयच्या या उत्तरावरून फारसे आश्चर्य वाटण्यासारखे नसले तरी, सासूला तो देत असलेले महत्त्व यानिमित अधोरेखित होते. 



अक्षय हा त्याच्या सिनेमांबरोबरच फॅमिलीबाबतही अधिक संवेदनशील असतो. जेव्हा-केव्हा त्याला फॅमिलीसोबत वेळ व्यतित करण्याची संधी मिळते तेव्हा तो त्याचा पुरेपूर लाभ घेतो. बºयाचदा पत्नी ट्ंिवकल, मुले अन् सासू डिंपल कपाडिया यांना एकत्र बघण्यात आले आहे. 

यावेळी अक्षयने अभिनेता जॅकी चॅन याच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तरे दिलीत. जॅकी चॅन हा अ‍ॅक्शनचा बादशाह असून, त्याच्या स्टंटवर मी नेहमीच फिदा असतो. त्याचा नुकताच ‘कुंग फू योगा’ हा सिनेमा रिलिज झाला आहे. या सिनेमाच्या प्रचारासाठी तो भारतात आला होता. सिनेमात त्याच्याबरोबर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर एका फॅन्सने त्याला शाहरूख खानविषयी दोन शब्द बोलण्याचे सांगितले, तेव्हा अक्षय म्हणाला की, शाहरूख हा डोक्याने काम करणारा एक व्यावसायिक अभिनेता आहे. तो खूपच आकर्षक व्यक्ती आहे. 



यावेळी त्याने पत्नी ट्ंिवकल खन्ना हिने लिहिलेले ‘मिसेज फनीबोन्स’ हे आवडते पुस्तक असल्याचेही म्हटले. तसेच मुलांसोबत गीर्यारोहण करणे अन् घरचे जेवण घेऊन पिकनिक जाण्याचा क्षण अनमोल असल्याचेही म्हटले. केपटाउन हे सुट्या साजºया करण्याचे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे त्याला वाटते. त्यामुळेच कदाचित तो नव्या वर्षाच्या स्वागतासाठी केपटाउनला गेला होता. याठिकाणी त्याचे घर असून, सुट्या साजºया करण्यासाठी तो येथे नियमित जात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आवडता खेळ क्रिकेट आणि बास्केटबॉल असल्याचेही त्याने म्हटले. अक्षयसोबत गप्पा मारण्याची संधी मिळाल्याने त्याचे फॅन्स प्रचंड खूश झाले होते. 

Web Title: Do you know Akshay Kumar's best friend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.