​Don't miss : ‘पद्मावती’बद्दल आहे एक ‘लार्जर देन लाईफ’ बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 14:02 IST2017-09-17T08:30:50+5:302017-09-17T14:02:53+5:30

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’ हा ऐतिहासिक सिनेमा मुहूर्ताच्या शॉटपूर्वीच चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत ‘पद्मावती’बद्दलच्या अनेक भल्या-बु-या बातम्या आपण ऐकल्यात. ...

Do not miss: 'Padmavati' is a 'bigger than life' news !! | ​Don't miss : ‘पद्मावती’बद्दल आहे एक ‘लार्जर देन लाईफ’ बातमी!!

​Don't miss : ‘पद्मावती’बद्दल आहे एक ‘लार्जर देन लाईफ’ बातमी!!

जय लीला भन्साळींचा ‘पद्मावती’ हा ऐतिहासिक सिनेमा मुहूर्ताच्या शॉटपूर्वीच चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत ‘पद्मावती’बद्दलच्या अनेक भल्या-बु-या बातम्या आपण ऐकल्यात. पण आता एक हटके खबर आहे. ज्या बातमीकडे ‘पद्मावती’चे चाहते डोळे लावून बसलेत, अशीच ही बातमी आहे. होय, चाहत्यांना लवकरच ‘पद्मावती’चे पहिले दर्शन होणार आहे. अर्थात ‘पद्मावती’ची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
‘पद्मावती’ यंदा रिलीज व्हावी, यासाठी भन्साळी युद्धस्तरावर काम करत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीजरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आठवड्याच्या आत ‘पद्मावती’चे पहिले पोस्टर व टीजर आपल्याला पाहता येणार आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फर्स्ट लूकमध्ये ‘पद्मावती’ची भव्यता आपण पाहू शकू. टीजरमध्ये ‘लार्जर देन लाईफ’ सीन्स असतील आणि यानंतर पात्रांचा खुलासा होणार. सूत्रांचे मानाल तर, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरचे चित्रपटातील काम जवळ जवळ संपले आहे. आता केवळ रणवीर सिंहच्या काही सीन्सचे शूटींग उरले आहे. याचदरम्यान ‘पद्मावती’ येत्या १७ नोव्हेंबर ऐवजी १ डिसेंबरला रिलीज होणार, अशीही खबर आहे. अर्थात भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

ALSO READ : दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल लूक’ तुम्हाला करून देईल परिकथांची आठवण!

‘पद्मावती’मध्ये दीपिका लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.   हा चित्रपट  राणी पद्मावती आणि बादशाह अलाउद्दीन खिल्जी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यात रणवीर आणि दीपिका  या दोघांशिवाय शाहीद कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. मध्यंतरी चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिल्जी यांच्यात रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार,अशी चर्चा ऐकून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी  ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड केली होती. इतिहासाचे चुकिचे दर्शन या चित्रपटातून घडविले जात असल्याचा आरोप भन्साली यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता.  

Web Title: Do not miss: 'Padmavati' is a 'bigger than life' news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.