Don't miss : इंटरनेटवर व्हायरल होतोय, लकी अलीच्या मुलीचा व्हिडिओ...तुम्हीही पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 11:47 IST2018-02-08T06:17:54+5:302018-02-08T11:47:54+5:30

‘ओ सनम’,‘क्यों चलती है पवन’ आणि ‘एक पल का जीना’ यासारख्या लोकप्रीय गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला गायक व अभिनेता लकी अली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थात यावेळी स्वत:मुळे नाही तर मुलीमुळे.

Do not miss: Lucky Ali's video is being viral on the internet ... You see too! | Don't miss : इंटरनेटवर व्हायरल होतोय, लकी अलीच्या मुलीचा व्हिडिओ...तुम्हीही पाहा!

Don't miss : इंटरनेटवर व्हायरल होतोय, लकी अलीच्या मुलीचा व्हिडिओ...तुम्हीही पाहा!

सनम’,‘क्यों चलती है पवन’ आणि ‘एक पल का जीना’ यासारख्या लोकप्रीय गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला गायक व अभिनेता लकी अली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थात यावेळी स्वत:मुळे नाही तर मुलीमुळे. होय, बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत लकी अलीची मुलगी तस्मिया गाताना दिसतेय.  हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही मानाल की, आपल्या वडिलांपेक्षा तस्मिया जराही कमी नाही. अ‍ॅक्टिंग ते सिंगींगमध्ये हात आजमावणाºया लकीच्या चाहत्यांसाठी तस्लिमाचा हा व्हिडिओ कुठल्या ट्रिटपेक्षा कमी नाही. खाली वेळात लकी अली मुलीला तयार करतोय. कदाचित तस्लिमा इतकी सुरेख गातेयं, त्याचे श्रेय लकी यालाचं द्यायला हवे.



तस्लिमाचा हा व्हिडिओ गोव्यातील आहे. सुट्टी साजरी करण्यासाठी लकी व तस्लिमा गोव्यात आले होते. याचठिकाणी त्यांची नफीसा अली हिच्याशी भेट झाली.
 तूर्तास लकी अली बॉलिवूड इंडस्ट्रीपेक्षा आपल्या लाईव्ह शोवर लक्ष देत आहे. लकी हा कॉमेडीचा बादशाह मेहमूदचा मुलगा आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. लकी एक गायक आहे तसाच एक चांगला अभिनेताही आहे. ‘कांटे’ या चित्रपटात त्याचा अभिनय आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्यानंतर लकी इंडस्ट्रीतून जणू गायब झाला. हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा उर्फ केट एलिझाबेथ हलाम आली. आयशा लकीपेक्षा २४ वर्षांपेक्षा लहान आहे.

ALSO READ : कॉमेडी किंग मेहमूदचा मुलगा लकी अली बॉलिवूडमध्ये फ्लॉप; पण झालीत तीन लग्ने!

Web Title: Do not miss: Lucky Ali's video is being viral on the internet ... You see too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.