​दिशा पटानीला आवडत नाहीत ‘बॉलिवूड पार्टीज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 20:18 IST2017-02-02T14:48:11+5:302017-02-02T20:18:11+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा जेमतेम एकच चित्रपट रिलीज झाला असला तरी ती ...

Do not like the direction of 'Bollywood Party' | ​दिशा पटानीला आवडत नाहीत ‘बॉलिवूड पार्टीज’

​दिशा पटानीला आवडत नाहीत ‘बॉलिवूड पार्टीज’

लिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिचा ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा जेमतेम एकच चित्रपट रिलीज झाला असला तरी ती चांगलीच चर्चेत आहे. आंतराष्ट्रीय अभिनेता जॅकी चॅन व बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कुंग फू योगा’ या आगामी चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्ही म्हणाल दिशाला चर्चेत राहणे आवडते असा समज चुकीचा ठरू शकतो. कारण दिशाला बॉलिवूड पार्टीज आणि चित्रपटाच्या दुनियेतील गॉसिप्समध्ये कोणतेच स्वारस्य नाही. खुद्द दिशा पटानी हिने ही कबुली दिली आहे. 

कुंग फु योगा या चित्रपटात जॅकी चॅन सोबत काम करणारी दिशा पटानी म्हणाली, ‘मी जेव्हा लोकांमध्ये असते तेव्हा मला अडचण होत असल्याचे जाणवते. मला अवघडल्यासारखे वाटते. मी चित्रपटांच्या पाटर्यांमध्ये जात नाही. मी असामाजिक आहे असे तुम्ही म्हणू शकता. मी दारू पीत नाही, कारण मी बाहेर जातच नाही. मला माहित नाही हे काय होत आहे. जर तुम्ही फिल्मी गॉसिप बद्दल बोलणार असलात तर ते काहीतरी आगळे वेगळे आहे असेच वाटायला लागते. जेव्हा मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करते तेव्हा मी त्याविषयीचे प्रशिक्षण घेण्यावर भर देते. मला वाटते हे माझ्यासाठी चांगले आहे’. 



दिशा म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये काम करणे महत्त्वाचे मानले जाते माझा याच्यावर विश्वास आहे, मात्र यासाठी कुटुंबाला किंवा आपल्या मित्रांना दूर ठेवता येत नाही. यामुळे मी माझ्या व्यावसायिक व खाजगी जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मला वाटते आपल्या जवळच्या लोकांना वेळ द्यायलाच हवा, माझ्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे’. आपल्या लूकबद्दल दिशा म्हणाली, कोणत्याही व्यक्तीचा लूक बदलणे त्याचे स्टाईल स्टेटमेंट ठरविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मला माझे केस आवडतात, यावर्षी मी माझ्या केसांचा रंग बदलण्याचा विचार करीत आहे. टीव्ही आणि जाहिरातीमध्ये माझ्या लूकवर मी प्रयोग करणार आहे असेही दिशा म्हणाली.

Web Title: Do not like the direction of 'Bollywood Party'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.