'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:53 IST2025-11-21T11:53:00+5:302025-11-21T11:53:35+5:30
हे अजिबातच नॉर्मल नाही, मी आवाज उठवणारंच..दिव्या खोसला कुमार भडकली

'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार पुन्हा चर्चेत आली आहे. निर्माते मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग तिने लीक केलं आहे. मुकेश भट तिच्याबद्दल एका मुलाखतीत काय म्हणाले असा जाब तिने फोनवर विचारला. यावर मुकेश भट यांनी मी असं का करेन? कोणीतरी हे प्लॅन केलंय असं उत्तर दिलं. आलिया भटच्या 'जिगरा' सिनेमावेळी दिव्याने थिएटमरमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादावर आक्षेप घेतला होता. हे तिने पब्लिसिटी स्टंट म्हणून केलं असा आरोप तिच्यावर काही जणांनी लावला. यावरुनचदिव्या खोसला आणि मुकेश भट यांच्यात वाद झालेला दिसत आहे.
दिव्या खोसला कुमारच्या 'सावी' सिनेमाची निर्मिती पती भूषण कुमार आणि मुकेश भट यांनी केली होती. 'सावी' ३१ मे रोजी रिलीज झाला तर आलिया भटचा 'जिगरा' ऑक्टोबरमध्ये आला. दिव्याने तेव्हा 'जिगरा'च्या मेकर्सवर कॉपीचा आणि बॉक्स ऑफिसवर खोटे आकडे दाखवल्याच आरोप लावला होता. काही दिवसांपूर्वी मुकेश भटने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत या वादावर चर्चा केली होती. दिव्याचा हा आरोप पब्लिसिटी स्टंट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर आता दिव्याने मुकेश भट यांच्याशी फोनवर झालेली बातचीत लीक केली. यामध्ये दोघांमध्ये झालेली चर्चा स्पष्ट ऐकू येते. मुकेश भट यांना दिव्याने थेट विचारल्यावर ते पलटले आहेत. 'मी असं का म्हणेन? हे सगळं प्लॅन केलेलं आहे' असं ते म्हणाले. दिव्याच्या वाढदिवशीच या बातम्या बाहेर आल्याने तिला दु:ख झालं आहे.
"मी या खुलाश्यामुळे खूप धक्क्यात आहे. हे खूपच दु:खद आहे. मी जड मनाने हे सत्य सर्वांसमोर आणत आहे. पण हे गरजेचंही आहे जेणेकरुन इंडस्ट्रीत लॉबिंग आणि गेटकिपींगचा शिकार होणाऱ्यांनाही मदत होईल. यामुळेच मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग पब्लिक करण्यावाचून माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. हे अजिबातच नॉर्मल नाही. इंडस्ट्रीतील माफियांचा चेहरा उघड करण्याची वेळ आली आहे. मी आवाज उठवणार आणि याचा सामना करणारच.", असं दिव्या म्हणाली.