टायगर श्रॉफच्या आधी पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती दिशा पटानी, ब्रेकअपच कारण वाचून तुम्हाला ही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:45 IST2019-05-15T13:00:24+5:302019-05-15T13:45:11+5:30
दिशा पाटनी सध्या बी-टाऊनची हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दिशा टायगर श्रॉफला डेट करतेय. मात्र टायगर आधी दिशा टीव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती.

टायगर श्रॉफच्या आधी पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती दिशा पटानी, ब्रेकअपच कारण वाचून तुम्हाला ही बसेल धक्का
दिशा पाटनी सध्या बी-टाऊनची हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दिशा टायगर श्रॉफला डेट करतेय. मात्र टायगर आधी दिशा टीव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती.
रिपोर्टनुसार, दिशा आणि पार्थ एकमेंकासोबत जवळपास एकवर्ष रिलेशनशीपमध्ये होते. दिशा त्यावेळी पार्थला डेट करायची जेव्हा ती इंडस्ट्रीत फारशी अॅक्टिव नव्हती. तर पार्थ त्यावेळी चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. या दोघांमधील ब्रेकअपचे कारण टीव्ही निर्माता विकास गुप्ता असल्याचे बोलले जाते. त्याचे झाले असे की, २०१६ मध्ये विकासवर मोलेस्टेशनचा आरोप करण्यात आला होता. वास्तविक हे दोघे गे रिलेशनशिपमध्ये होते. रिपोर्टनुसार पार्थ बायसेक्शुअल आहे. जेव्हा त्याचे दिशासोबत अफेअर सुरू होते, त्याचवेळी त्याचे विकाससोबतही अफेअर सुरू होते. अशात जेव्हा ही बाब दिशाच्या लक्षात आली, तेव्हा तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.
सध्या दिशा टायगरला डेट करीत आहे. दोघे नेहमीच सिनेमागृह, हॉटेल आणि पार्ट्यांमध्ये एकत्र बघावयास मिळतात. परंतु अशातही अद्यापपर्यंत या दोघांनी त्यांच्यातील नात्याची जाहीरपणे कबुली दिली नाही. तर दुसरीकडे पार्थ त्याची को-स्टार एरिका फर्नांडिससोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, दिशा लवकरच सलमान खानसोबत 'भारत'मध्ये दिसणार आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.