टायगरला सोडून दुसऱ्याचसोबत फिरायला निघाली Disha Patni, कॅमेरा बघताच लपवला चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:23 IST2022-05-31T13:23:06+5:302022-05-31T13:23:27+5:30
Disha Patni Video: दिशा पटनीच्या सौंदर्यावर जीव ओवाळणारे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फॅन्सना याचाही अंदाज आहे की, टायगर श्रॉफ आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे.

टायगरला सोडून दुसऱ्याचसोबत फिरायला निघाली Disha Patni, कॅमेरा बघताच लपवला चेहरा
Disha Patni Video: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी अशी अभिनेत्री आहे जिची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिशाने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हापासून तिचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं जात आहे. दोघेही त्यांचं नातं जाहीरपणे स्वीकारत नसले तरी, नेहमीच दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसतात. पण यावेळी दिशा टायगर नाही तर दुसऱ्याच व्यक्तीसोबत दिसली. महत्वाची बाब म्हणजे ती यावेळी कॅमेरापासून चेहरा लपवताना दिसली.
दिशा पटनीच्या सौंदर्यावर जीव ओवाळणारे लाखो फॅन्स आहेत. तिच्या फॅन्सना याचाही अंदाज आहे की, टायगर श्रॉफ आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे. पण ती नुकतीच एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसली. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दिशा तिच्या एका मित्रासोबत मॉर्निंग वॉकला निघाली होती. कॅमेराने जसंही तिच्यावर फोकस केलं ती तिचा चेहरा लपवताना दिसली.
दिशा यावेळी डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क लावून दिसली. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, फोटोग्राफर्स दिसल्याबरोबर ती जरा बिचकली आणि तिने चेहर लपवण्याचा प्रयत्न केला. तिला फोटो काढायचे नव्हते. यावरूनच यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांना हे जाणून घ्यायचं आहे की, दिशा चेहरा का लपवत होती आणि यावरूनच लोक व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
दिशाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती लवकरच 'एक विलेन रिटर्न्स' मध्ये दिसणार आहे. मोहित सूरी दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. हा सिनेमा २०१४ साली आलेल्या 'एक व्हिलन'चा सीक्वल आहे. तसेच दिशा 'योद्धा' सिनेमातही दिसणार आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.