दिशा पाटनीचे कपडे पाहून युजर्सची सटकली; म्हणाले, कधी तर चांगले कपडे घाल...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 17:46 IST2021-03-03T17:45:52+5:302021-03-03T17:46:50+5:30
काल 2 मार्चला टायगरने तीन स्पेशल व्यक्तिंसोबत आपला वाढदिवस साजरा केला. कोण तर, गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी, आई आयशा श्रॉफ आणि बहिण कृष्णा श्रॉफ.

दिशा पाटनीचे कपडे पाहून युजर्सची सटकली; म्हणाले, कधी तर चांगले कपडे घाल...!
काल 2 मार्चला अभिनेता टायगर श्रॉफने त्याचा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस टायगरने तीन स्पेशल व्यक्तिंसोबत साजरा केला. कोण तर, गर्लफ्रेन्ड दिशा पाटनी, आई आयशा श्रॉफ आणि बहिण कृष्णा श्रॉफ. रेस्टॉरंट मधून बाहेर पडतानाचा या चौघांचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर काय तर दिशा ट्रोल झाली. होय, नेहमीप्रमाणे कपड्यांवरून लोकांनी दिशाला ट्रोल केले.
या डिनर पार्टीसाठी दिशाने कूल लूक निवडला होता. ब्लॅक कलरची स्ट्रेट कट जीन्स आणि त्यावर कॉर्सेट टाइपचे वेलवेटचे टॉप. लो कट नेकलाईनचे दिशाने कॅरी केलेले हे टॉप अनेकांना आवडले नाही. मग काय अनेकांनी यावरून दिशाला ट्रोल केले. दिशा, कधी तर ढंगाचे कपडे घाल, असेही काहींनी तिला सुनावले. किती वाईट दिसतेय, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल केले.
दिशा व टायगर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अद्यापही दोघांनी जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. कधी हॉलिडे, कधी डिनर डेट एन्जॉय करताना दोघांचेही फोटो चर्चेत असतात. 2016 साली ‘बेफिक्रा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये टायगर व दिशा पहिल्यांदा एकत्र दिसले होते. यानंतर अहमद खान यांच्या ‘बागी 2’ या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर टायगर लवकरच बागी 4, हिरोपंती 2, गणपत व रेम्बोच्या रिमेकमध्ये दिसणर आहे. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमानसोबत दिसणार आहे. ती सध्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात व्यग्र आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय नागिन आणि रणबीर कपूरसोबत लव रंजन दिग्दर्शित एका चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.