दिशा पटानीने बटरफ्लाय किकचा व्हिडीओ केला शेअर, टायगर आणि त्याची आई म्हणाली....

By अमित इंगोले | Published: October 9, 2020 09:49 AM2020-10-09T09:49:03+5:302020-10-09T09:49:27+5:30

दिशा पटानीची ही बटरफ्लाय किक पाहून तिचा कथित बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा श्रॉफ फिदा झाली आहे.

Disha Patani shares butterfly kick video and Tiger Shroff and Ayesha Shroff commented on her post | दिशा पटानीने बटरफ्लाय किकचा व्हिडीओ केला शेअर, टायगर आणि त्याची आई म्हणाली....

दिशा पटानीने बटरफ्लाय किकचा व्हिडीओ केला शेअर, टायगर आणि त्याची आई म्हणाली....

googlenewsNext

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये मोजली जाणारी अभिनेत्री दिशा पटानी आपल्या फिटनेसबाबत फारच सजग राहते. आपल्या वर्कआउटचे व्हिडीओज आणि फोटोज ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या बटरफ्लाय किकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दिशा पटानीची ही बटरफ्लाय किक पाहून तिचा कथित बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा श्रॉफ फिदा झाली आहे.

सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स असणाऱ्या दिशा पटानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुरूवारी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती बटरफ्लाय किक करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने 'बटरफ्लाय किक' असं कॅप्शन दिलं आहे. पटानीच्या व्हिडीओवरर कमेंट करत टायगर श्रॉफने 'क्लीन' तर आयशा श्रॉफने 'दिशू' असं लिहिलंय.  (म्हणे, सलमान खूपच गोड...! दिशा पटानी ‘भाईजान’वर फिदा, क्षणात दिला होकार)

बटरफ्लाय किक ही मार्शल आर्टमधील एक जंपिंग किक आहे जी निगल किकच्या रूपातही ओळखली जाते. दिशाची ही किक पाहून काही यूजर्सनी काही मजेदारही कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, टायगरसोबत राहूनच तू अशी झाली आहे. हा त्याचाच प्रभाव आहे.

दिशाच्या कामाबाबत सांगायचं तर ती सलमान खानच्या आगामी 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी ईदला रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याचं काम शिल्लक राहिलं आहे.
 

Web Title: Disha Patani shares butterfly kick video and Tiger Shroff and Ayesha Shroff commented on her post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.