दिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 11:54 AM2020-09-29T11:54:20+5:302020-09-29T11:55:48+5:30

चाहतेही प्रेमात... काहीच तासांत 1 लाखांवर लाइक्स

disha patani flaunts red lipstick her new selfie | दिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल

दिशा पटानीच्या या ‘रेड लिपस्टिक’ सेल्फीवर टायगरही फिदा, सोशल मीडियावर क्षणात झाला व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देदिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास एक वर्ष पार्थला डेट करत होती.

‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी  फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच एक असाच फोटो तिने शेअर केला आणि तो पाहून चाहते अक्षरश: तिच्यावर फिदा झाला. चाहतेच नाही तर टायगर श्रॉफही तिच्या या फोटोच्या प्रेमात पडला.
या फोटोत दिशा हॉट रेड लिपस्टिकमध्ये दिसतेय.

या फोटोत दिशा अतिशय सिंपल लूकमध्ये आहे. मोकळे, विखुरलेले केस, अगदी लाईट मेकअपमध्ये ती दिसतेय. पण तरीही तिच्या या सेल्फीने अनेकांना वेड लावले आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडतोय. किती सुंदर दिसतेय, असे एका युजरने लिहिले आहे तर अनेकांनी तिला तिच्या सौंदर्याचे रहस्य काय? असा प्रश्न केला आहे. एका युजरने दिशाच्या डोळ्यांची स्तूती केली आहे. हार्ट आणि फायर इमोजी टाकून चाहते या फोटोवर रिअ‍ॅक्ट होत आहेत.

टायगरनेही केली कमेंट
दिशाचा हा सेल्फी पाहून टायगर श्रॉफही त्याच्या भावना रोखू शकल्या नाही. या फोटोवर कमेंट करताना त्याने एक फायर इमोजी पोस्ट केले़ शिवाय ‘लाइनर ऑन पॉइंट’अशी कमेंट केली.  

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जाते. हे कपल अनेकदा  रेस्टॉरंट व मल्टीप्लेक्समध्ये दिसते. अद्याप दिशा व टायगर यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. आमच्यात केवळ मैत्री असल्याचे या दोघांनी अनेकवेळा सांगितले आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात टायगरने त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी करणने त्याला तू दिशाला डेट करत आहेस का असे विचारले होते. त्यावर माझे इंडस्ट्रीत खूपच कमी फ्रेंड्स आहेत. दिशा ही त्यामधीलच एक फ्रेंड आहे असे त्याने उत्तर दिले होते.

टायगरच्याआधी दिशा एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता छोट्या पडद्यावर प्रचंड प्रसिद्ध असून त्याची एक मालिका चांगलीच गाजत आहे. दिशा पटानी एकेकाळी प्रसिद्ध टिव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.  पार्थ एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये अनुरागच्या भूमिकेत दिसला होता.

दिशा तिच्या मॉडेलिंगच्या काळात जवळपास एक वर्ष पार्थला डेट करत होती. पण अचानक या दोघांचे ब्रेकअप झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ दिशाला चीट करत होता आणि याबाबत दिशाला समजल्यावर तिने पार्थ पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता़ पण या दोघांनीही याबाबत बोलणे टाळले होते.

PHOTOS: दिशा पटानीचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल, फोटा पाहून चाहते झाले घायाळ

Web Title: disha patani flaunts red lipstick her new selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.