दिशा पटानी टायगर श्रॉफसह नाही तर 'या' व्यक्तीबरोबर सेलिब्रेट केला व्हॅलेंटाईन डे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:51 IST2020-02-14T15:48:32+5:302020-02-14T15:51:08+5:30
दिशा पटानी टायगर श्रॉफसह रिलेशनशिपमध्ये असल्याच्या नेहमीच चर्चा रंगत असतात.

दिशा पटानी टायगर श्रॉफसह नाही तर 'या' व्यक्तीबरोबर सेलिब्रेट केला व्हॅलेंटाईन डे !
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुन्हा दिशा आणि टायगरवर चर्चा होत आहे. त्याचे झाले असे की, दिशा नटून थटून बाहेर पडताच सा-यांना वाटले की, ती आता टायगर श्रॉफसह व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी निघाली असेल. पण झाले दुसरेच दिशा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बाहेर पडली खरी पण टायगरला नाही भेटली तर 'मलंग' सिनेमाच्या स्टारकास्टसह तिने सेलिब्रेशन केले. त्यामुळे टायगरला विसरून आता दिशाला आदित्यही जवळचा वाटू लागल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. या फोटोला कॅप्शन देताना दिशानं लिहिलं, ‘माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तींसोबत’ दिशानं शेअर केलेल्या 1 तासात जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
दिशा पटानी टायगर श्रॉफसह रिलेशनशिपमध्ये असल्याच्या नेहमीच चर्चा रंगत असतात. त्यामुळे दिशा आणि टायगर यांना एकत्र कधी पाहता येईल याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. पण या दोघांनीही त्यांचे नाते कधी स्विकारले नाही. तसेच दिशा पटानीनेच एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हापासून ती मुंबईत आली आहे तेव्हापासून तिला मस्तमौला जीवन जगण्याची संधी मिळाली नाही आणि लोकांना भेटायला व त्यांच्यावर प्रेम करण्याचीही संधी नाही.
दिशाला टायगरला डेट करत असल्याबाबत विचारलं, त्यावर ती म्हणाली की, कित्येक वर्षांपासून मी माझे नशीब आजमावत आहे, पण काहीही झालं नाही. आम्ही एकत्र जेवायला जातो, फिरतो मात्र याचा अर्थ हा नाही की टायगर माझ्यावर इंम्प्रेस झाला आहे. टायगर आणि मी लाजाळू आहोत. त्यामुळे दोघांमध्ये पुढे काहीही घडत नाही.