घरावर झालेल्या गोळीबारानंतर न्यूयॉर्कमध्ये दिसली दिशा पटानी, समोर आला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 09:40 IST2025-09-14T09:38:48+5:302025-09-14T09:40:02+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर दोन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी(१२ सप्टेंबर) ही घटना घडली. घरावर झालेल्या गोळीबारानंतर दिशाला न्यूयॉर्कमध्ये स्पॉट करण्यात आलं.

घरावर झालेल्या गोळीबारानंतर न्यूयॉर्कमध्ये दिसली दिशा पटानी, समोर आला व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर दोन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी(१२ सप्टेंबर) ही घटना घडली. पहाटे ४.३० च्या सुमारास, सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार-पाच राउंड फायर केले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. या घरात दिशा पटानीचे वडील, निवृत्त उपअधीक्षक जगदीश पटानी राहतात. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. घरावर झालेल्या गोळीबारानंतर दिशाला न्यूयॉर्कमध्ये स्पॉट करण्यात आलं.
दिशा पटानीने न्यूयॉर्कमध्ये एका इव्हेंटला हजेरी लावली होती. दिशा केल्विन क्लेनची ब्रँड अम्बेसिडर आहे. याच ब्रँडच्या एका इव्हेंटसाठी ती न्यूयॉर्कला गेली होती. या इव्हेंटसाठी दिशाने खास काळ्या रंगाचा डीपनेक बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिशाचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.
दरम्यान, दिशा पाटनीची बहीण खूशबूने प्रेमानंद महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती ज्याची बरीच चर्चा झाली होती. याच कारणावरुन गुंडांनी तिच्या घरावर गोळीबार केल्याचं बोललं जात होतं. हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डी बरार आणि रोहित गोदारा यांनी लिहिलं होतं की "आपले पूज्य संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराजांचा अपमान केला. आपल्या पूज्य देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा केवळ एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी कोणी आपल्या धर्मासंदर्भात कुठल्याही प्रकरे अपमाण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या घरातल्या कुणालाही जिवंत सोडणार नाही".