"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 11:48 IST2025-05-12T11:47:52+5:302025-05-12T11:48:12+5:30
पाकिस्तानातील काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन सुहागरात होईल अशी भारतावर टीका केली होती. त्यावर दिशा पाटनीच्या बहिणीने खडे बोल सुनावत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे

"तुम्हाला आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल.."; दिशा पाटनीच्या आर्मी ऑफिसर बहिणीने पाकिस्तानची बोलती केलं बंद
भारत-पाकिस्तान देशात सध्या युद्ध थांबलं असलं तरी भारतानेपाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी भारताला दोष दिले आणि टीकाही केली. अशातच अभिनेत्री दिशा पाटनीची (disha patani) बहीण आणि माजी आर्मी अधिकारी खुशबू पाटनीने (khushboo patani) एक व्हिडीओ शेअर करुन पाकिस्तानची बोलती चांगलीच बंद केली आहे. काय म्हणाली खुशबू, जाणून घ्या
खुशबूने पाकिस्तानची केली बोलती बंद
खुशबूने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती म्हणते की, "तुम्ही सर्वांनी ब्रम्होसच्या विषयी ऐकलं असेलच. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील अनेक लोक बोलत होते की आता ऑपरेशन सुहागरात होईल. तर मित्रा, भारताने सुहागरात साजरी केली आहे आणि उद्या मधुचंद्राच्या रात्री जे दूध आणि हळद वापरली जाते, ती तुमच्यापर्यंत ब्रम्होसच्या माध्यमातून पोहचेल."
"ब्रम्होस कसं आहे हे विचारायचं असेल तर पाकिस्तानी नागरिकांना विचारा. भारताने पहिल्यांदा ब्रम्होस लाँच केलं. मजा आली. मला आशा आहे की, पाकिस्तानला आमचं दूध आणि हळद चांगली वाटलं असेल. त्यांना आमच्या ब्रम्होसची ताकद समजली असेल", अशाप्रकारे खुशबूने पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. खुशबूने भारतीय आर्मीत मेजरपदावर काम केलंय. ती सोशल मीडियावर भारतीय सेनेच्या विविध मिशनविषयी लोकांना जागरुक करत असते. खुशबूचे इन्स्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. खुशबू एक फिटनेस कोच आणि मार्गदर्शकही आहे.