राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 20:07 IST2023-11-17T20:02:03+5:302023-11-17T20:07:27+5:30

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या मुलीचा बारसं नुकताच झाला. या सोहळ्याचे अनेक फोटो समोर आली आहेत

Disha Parmar, Rahul Vaidya host baby naming ceremony, reveal daughter's name | राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा; फोटो आले समोर

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या दिशा परमार आणि राहुल वैद्य काही महिन्यांपूर्वीच आईबाबा झाले आहेत. ते आपल्या मुलीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता नुकतेच जोडप्याने मोठ्या दणक्यात त्यांच्या लाडक्या लेकीचं बारसं केलं.  या सोहळ्याचे काही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. 


दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या मुलीचे नाव ठेवले आहे. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दिशा परमार आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'नव्या' वैद्य ठेवले आहे. राहुल वैद्यने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये राहुल वैद्य निळ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. तर दिशा पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडीत अगदी सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना त्यांनी 'नव्याचा नामकरण सोहळा' असे कॅप्शन लिहिले आहे.


दिशा आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य करायचं झालं तर, त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात सोशल मीडियावर एका कमेंटने झाली होती. राहुलचा एक म्युझिक व्हिडीओ पाहून दिशा प्रभावित झाली आणि तिने कमेंट केली. दिशा परमारची ही कमेंट पाहून राहुल खूश झाला. पहिल्या म्युझिक अल्बमच्या शूटिंगनंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. २०२० मध्ये 'बिग बॉस १४' शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केलं. या लव्हबर्ड्सनी १८ मे २०२३ रोजी सोशल मीडियावरून आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. 

Web Title: Disha Parmar, Rahul Vaidya host baby naming ceremony, reveal daughter's name