‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:38 IST2021-09-07T08:37:46+5:302021-09-07T08:38:11+5:30

डायमंड, सोने आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन या मंगळसूत्रासाठी वापरण्यात आले आहेत. अतिशय नाजूक आणि सुबक असणारं हे मंगळसूत्र ‘क्लासी’ लूक देणारं आहे.

Discussion of Priyanka chopra's 'Mangalsutra' ... pdc | ‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

वेस्टर्न कपडे घातले की त्यावर मंगळसूत्र कसं घालावं, हा प्रश्न अनेक स्त्रियांना पडतो. पण, हा प्रश्न अभिनेत्री प्रियंका चोप्रानं सोडवला आहे. नुकतंच प्रियंकानं एक फोटोशूट केलं. हे फोटोशूट गाजतंय ते तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रानं. तिनं हे मंगळसूत्र एका वेस्टर्न गाऊनवर घातलेलं आहे. प्रियंकानं गळ्यात घातलेलं ते मंगळसूत्र आहे हे पाहता क्षणी लक्षातही येत नाही. प्रियंकाने घातलेलं हे मंगळसूत्र ‘बल्गारी’ या इटालियन लक्झरी ब्रॅण्डचं आहे. पाच लहान लहान गोल आकाराचे डिझाइन्स या मंगळसूत्रात आहेत.

डायमंड, सोने आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन या मंगळसूत्रासाठी वापरण्यात आले आहेत. अतिशय नाजूक आणि सुबक असणारं हे मंगळसूत्र ‘क्लासी’ लूक देणारं आहे. महिलांना आवडतील असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स बल्गारी ब्रॅण्ड लवकरच बाजारपेठेत आणणार आहे, असंही प्रियंकानं या फोटोशूटनंतर सांगितलं.

Web Title: Discussion of Priyanka chopra's 'Mangalsutra' ... pdc