डिस्को डान्सर मिथुनदाची पत्नी आहे सौंदर्यवती,मात्र आर्थिक तंगीमुळे सध्या करावं लागतं आहे हे काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:38 IST2017-12-15T07:06:28+5:302017-12-15T12:38:46+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता,चित्रपटसृष्टीच नाही तर भारतात डिस्को डान्स प्रकार लोकप्रिय करणारे अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. आपला अभिनय, डान्सच्या जोरावर ...
.jpg)
डिस्को डान्सर मिथुनदाची पत्नी आहे सौंदर्यवती,मात्र आर्थिक तंगीमुळे सध्या करावं लागतं आहे हे काम!
ब लिवूडचे प्रसिद्ध अभिनेता,चित्रपटसृष्टीच नाही तर भारतात डिस्को डान्स प्रकार लोकप्रिय करणारे अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती. आपला अभिनय, डान्सच्या जोरावर मिथुन चक्रवर्ती यांनी रसिकांवर जादू केली आणि त्यांचे लाडके मिथुनदा बनले. कोणत्याही वादापासून मिथुनदा यांनी स्वतःला दूर ठेवलं. त्यामुळे शांत स्वभावाच्या मिथुनदांबद्दल रसिकांच्या मनात विशेष प्रेम आणि आदर आहे. मात्र मिथुनदा यांच्या खासगी जीवनातील एक बाब ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मिथुन यांच्या पत्नीचे नाव हेलेना ल्यूक असं आहे. 70 च्या दशकात हेलेना एक फॅशन जगातातील एक प्रसिद्ध आणि चर्चित चेहरा होती. मात्र हेलेनाशी लग्न करण्याआधी मिथुनदांचं अभिनेत्री सारीकाशी अफेअर होते.दोघंही प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र मिथुनदा आणि सारिका यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. वारंवार दोघांमध्ये खटके उडू लागले, वाद होऊ लागले. त्यामुळे मिथुनदांनी सारिकापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सारिकाशी ब्रेकअप झाल्यानंतर याच काळात मिथुनदांची भेट हेलेनाशी झाली. पहिल्याच नजरेत मिथुनदांना हेलेना भावली.1979 साली मिथुन आणि हेलेना लग्नबंधनात अडकले. 1980 साली हेलेनाला जुदाई सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात हेलेनानं या सिनेमापासून केली. या सिनेमात त्यांची भूमिका सहकलाकाराची होती. या छोट्याशा भूमिकेने हेलेनानं सा-यांचं लक्ष वेधून घेतलं. जुदाईनंतर आणखी तीन सिनेमात हेलेनानं काम केलं. मात्र हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही चालले नाही. त्यामुळे अभिनयाच्या दुनियेत हेलेनाचं नाव हरवलं.मिथुनदांशी घटस्फोट घेतल्यानंतर हेलेना प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली. त्यामुळेच तिने काम शोधण्यास सुरुवात केली.मात्र कामही मिळत नव्हतं.त्यामुळे काय करावं असं हेलेनाला सुचत नव्हतं. अखेर हेलेनाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की तिनं फ्लाइट अटेंडन्ट म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली,उदरनिर्वाह आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मिथुन चक्रवर्ती या पत्नीला आता नोकरी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.आता हेलेना आणि मिथुनदा यांचा दोघांचा कोणत्याही प्रकारचा एमेकांशी संपर्क राहिलेला नाही.
![]()