माझा मुलगा मला परत द्या...! परतली दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दत्तक घेतलेल्या मुलाची खरी आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:11 IST2020-12-10T12:10:13+5:302020-12-10T12:11:20+5:30

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला सध्या खासगी आयुष्यात एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय.

Director Siddharth Anand engaged in a twisted custodial battle with the biological mother of his adopted baby boy | माझा मुलगा मला परत द्या...! परतली दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दत्तक घेतलेल्या मुलाची खरी आई

माझा मुलगा मला परत द्या...! परतली दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दत्तक घेतलेल्या मुलाची खरी आई

ठळक मुद्देसिद्धार्थ आनंद हा बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक आहे. ममता भाटियासोबत त्याचे लग्न झाले. त्यांना रणवीर नावाचा एक मुलगा आहे.

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सध्या ‘पठान’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. याच सिद्धार्थ आनंदला सध्या खासगी आयुष्यात एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. दत्तक घेतलेल्या मुलासाठी आता त्याला कोर्टात दाद मागण्याची वेळ आली आहे. होय, सिद्धार्थ आनंदने एका मुलाला दत्तक घेतले होते. पण आता त्याची खरी आई परत असून तिने या मुलावर दावा केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबई पोलिसांना बोरीवली रेल्वे स्टेशनवर एक मनोरूग्ण महिला आपल्या मुलाला दूध पाजताना आढळली होती. या मुलाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमांचे व्रण होते. या महिलेची स्थिती आणि बाळाची नाजूक प्रकृती बघता, पोलिसांनी या मुलाला बाल कल्याण समितीकडे सोपवले होते आणि  मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलेला कर्जतच्या श्रद्धा पुनर्वसन फाऊंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. इकडे त्या मनोरूग्ण आईवर उपचार सुरु होते आणि तिकडे तिच्या मुलाला अनाथ ठरवण्याची प्रक्रिया.  बालकल्याण समितीने कुटुंब सेवा केंद्राच्या मदतीने मुलाला अनाथ मानले आणि त्याची रवानगी अनाथ आश्रमात झाले. पुढे याच  आश्रमातून सिद्धार्थने या मुलाला दत्तक घेतले. या मुलाने सिद्धार्थला थोड्याच दिवसांत लळा लावला.

अन् अचानक आई परतली...
सिद्धार्थ आपल्या दत्तक मुलासोबत आनंदात होता. अशात अचानक एक दिवस त्या मुलाची आई सिद्धार्थच्या घरी पोहोचली. तिने मुलगा परत मागितला. यादरम्यान जेजे इस्पितळात मुलाची डीएनए चाचणी करण्यात आली आणि हे मुल हे त्या महिलेचेच असल्याचेच असल्याचे सिद्ध झाले आहे. आता तिला आपले मुल परत हवे आहे. सिद्धार्थ आनंद मात्र मुलाला सोडायला तयार नाही. मग काय तो पोलिसांत गेला.
 या प्रकरणात  बालकल्याण समितीने  मुलाच्या आईला आपला मुलगा परत मागण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. कारण ती आता पूर्णपणे ठीक झाली आहे. 

कोण आहे सिद्धार्थ?
सिद्धार्थ आनंद हा बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक आहे. ममता भाटियासोबत त्याचे लग्न झाले. त्यांना रणवीर नावाचा एक मुलगा आहे. सिद्धार्थने हृतिक रोशनसोबत ‘बँग बँग’ सिनेमा बनवला होता. यानंतर हृतिक व टायगरला घेऊन त्याने ‘वॉर’ हा सिनेमा बनवला. हा सिनेमा 2013 सालचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. आता सिद्धार्थ हृतिकसोबत ‘फाईटर’ नावाचा सिनेमा बनवणार असल्याचेही कळते. तूर्तास तो ‘पठान’ या सिनेमात बिझी आहे.

Web Title: Director Siddharth Anand engaged in a twisted custodial battle with the biological mother of his adopted baby boy