Luv Marriage: ‘सोनू के टीटू की स्वीटी’चे दिग्दर्शक लव रंजन यांनी गर्लफ्रेन्ड अलीशासोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 10:17 IST2022-02-21T10:09:07+5:302022-02-21T10:17:05+5:30

 प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटी सारखे हिट सिनेमे बनणारे दिग्दर्शक व निर्माते लव रंजन (Luv Ranjan) अखेर लग्नबंधनात अडकले. काल 20 फेब्रुवारीला लव यांनी गर्लफ्रेन्ड अलीशा वैद्य (Alisha Vaid) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.

Director Luv Ranjan Ties Knot To His Girlfriend Alisha Vaid | Luv Marriage: ‘सोनू के टीटू की स्वीटी’चे दिग्दर्शक लव रंजन यांनी गर्लफ्रेन्ड अलीशासोबत बांधली लग्नगाठ

Luv Marriage: ‘सोनू के टीटू की स्वीटी’चे दिग्दर्शक लव रंजन यांनी गर्लफ्रेन्ड अलीशासोबत बांधली लग्नगाठ

Luv Marriage: प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटी सारखे हिट सिनेमे बनणारे दिग्दर्शक व निर्माते लव रंजन (Luv Ranjan) अखेर लग्नबंधनात अडकले. काल 20 फेब्रुवारीला लव यांनी गर्लफ्रेन्ड अलीशा वैद्य (Alisha Vaid) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. आगऱ्यातील एका अलिशान हॉटेलात हा विवाह सोहळा पार पडला.

लव रंजन व अलीशा यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. रणबीर कपूर, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, वरूण शर्मा, कार्तिक आर्यन, सनी सिंह, नुसरत भरूचा, भुषण कुमार, दिनेश विजान आदी सेलिब्रिटी या लग्नात हजर होते.  लग्नानंतर लगेच रिसेप्शन आयोजित केलं गेलं.

कोण आहे लव रंजन यांची पत्नी अलीशा
लव रंजन यांची नववधू अलीशा हिच्याबद्दल इंटरनेटवर फार माहिती उपलब्ध नाही. पण रिपोर्टनुसार, लव व अलीशा कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. कॉलेजात दोघांची पहिली भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी दोघं मनीष मल्होत्राच्या स्टोरमध्ये स्पॉट झाले होते. लव व अलीशाचा लग्नाचा पोशाख मनीष मल्होत्रा व सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाईन केला होता.

लव रंजन सध्या रणबीर कपूर व श्रद्धा कपूर यांच्या सिनेमात बिझी आहे. या चित्रपटाचा काही भाग स्पेनमध्ये शूट केला जाणार आहे. प्यार का पंचनामा या चित्रपटामुळे लव रंजन बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेत. यानंतर आकाशवाणी, प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटी असे एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. दे दे प्यार , मलंग हे सिनेमे त्यांनी प्रोड्यूस केलेत.

Web Title: Director Luv Ranjan Ties Knot To His Girlfriend Alisha Vaid