आजोबांची अंत्ययात्रा निघताच ढसाढसा रडली सुनैना रोशन, हृतिकही झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:42 IST2019-08-07T15:35:06+5:302019-08-07T15:42:21+5:30
आज सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही.

आजोबांची अंत्ययात्रा निघताच ढसाढसा रडली सुनैना रोशन, हृतिकही झाला भावूक
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याच्या कुटुंबात सध्या शोकाचे वातावरण आहे. आज बुधवारी सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही.
आजोबांचे पार्थिव बघून सुनैना स्वत:ला सांभाळू शकली नाही आणि ती रडू लागली. तिचे रडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राकेश रोशन यांनी सास-यांच्या पार्थिवाला खांदा दिला. हृतिकनेही अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आपल्या आजोबांना अखेरचा निरोप दिला.
बॉलिवूडचे अनेक दिग्गज जे ओम प्रकाश यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, धर्मेन्द्र आदी यावेळी हजर होते.
हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान ही सुद्धा या अंत्ययात्रेत सामील झाली. यावेळी ती आपल्या मुलासोबत दिसली. हृतिक रोशन आजोबांच्या अतिशय जवळ होता. ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तो त्यांच्याबद्दल भरभरून बोलला होता. माझे नाना माझे ‘सुपर टीजर’ होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. आज तेच मी माझ्या मुलांना शिकवतो आहे, असे तो म्हणाला होता.
जे. ओम प्रकाश हे बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते होते. आखिर क्यूँ आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे. 1974 मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. अफसाना दिलवालों का, आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अपर्ण, आस पास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.त्याआधी निर्माते अशी त्यांनी ओळख होती. 1961 साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला आणि तुफान गाजलेला ‘आँधी’ हा चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला. आप की कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है, अपनापन,, गेट वे आॅफ इंडिया अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.