n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">विराट कोहली हा आज क्रिकेट जगतातील एक यशस्वी क्रिकेटर मानला जातो. विराट मैदानावर असला की भारतीय संघाला विजय मिळणार हा सगळ्यांनाच विश्वास असतो. विराट हा ज्याप्रमाणे क्रिकेट जगतातील हिरो आहे त्याप्रमाणेच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. विराट नेहमीच अनेक एनजीओंना मदत करत असतो. त्यांना देणगी देत असतो. आता विराटने स्माईल फाऊंडेशनसोबत येऊन एक चांगले काम करण्याचे ठरवले आहे. येत्या शुक्रवारी मुंबईतील हयात रिजेन्सी या हॉटेलमध्ये एक डिनर आयोजित करण्यात आला आहे. या डिनरचे यजमानपद विराट भूषवणार आहे. तसेच यावेळी स्माईल फाऊंडेशनच्या मदतीसाठी एक लिलावही आयोजित करण्यात आलेला आहे. या लिलावामध्ये विराटने स्वाक्षरी केलेल्या हेल्मेटची बोली लावली जाणार आहे आणि या सगळ्यातून येणारा पैसा स्माईल फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमसाठी विराट खूप उत्सुक आहे. याविषयी विराट म्हणतो, "या कार्यक्रमाद्वारे समाजातील विविध स्तरातील लोक एका चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येत आहेत. यासाठी प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि त्यांची टीम २०० लोकांचे जेवण बनवणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा केवळ मूलांच्या मुलभूत गरजा भागवणे हा नाहीये तर मुलांना शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभे करणे हा खरा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आयुष्यात येणाऱया सगळ्या आव्हांनानासाठी आपण त्यांना तयार केले पाहिजे. कारण हीच पिढी आपले भविष्य आहे. या कार्यक्रमाद्वारे आम्ही शिक्षणाचा प्रसार करणार आहोत. भारतातील दारिद्रयरेषेखाली, दुर्लक्षित मुलांना चांगल्यातले चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे." स्माईल फाऊंडेशन गेली अनेक वर्ष समाजातील दुर्लक्षित, गरीब मुलांसाठी काम करत आहे. या संस्थेमार्फत मुलांना शिक्षण दिले जाते. तसेच त्यांच्या जेवण्याखाण्याकडे लक्ष दिले जाते. त्यांचे संपूर्ण पोषणच ही संस्था करते.
मुंबईत होणाऱया या लिलावामध्ये विराट कोहलीसोबत प्रसिद्ध शेफ विकास खन्नाच्या उत्सव या पुस्तकाचाही लिलाव होणार आहे. या पुस्तकाचे वजन १५ किलो असून यात १२०० पाने आहेत. या पुस्तकात विकासने भारतीय सण, समारंभ, रितीरिवाज, भारतातील पदार्थ यांविषयी लिहिले आहे. त्याने हे पुस्तक आतपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय सेलिब्रेटींना भेट म्हणून दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, त्यांची पत्नी हिलरी, तिबेटचे दलाई लामा यांसारख्या सेलिब्रेटींचा यामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमात लिलाव होणाऱया पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाच्या कव्हरमध्ये ५० ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या कव्हरचे डिझाईन प्रसिद्ध डिझायनर सुविग्या शर्मा यांनी केलेले आहे. संगीतकार अरमान मलिक हेदेखील नेहमीच विकास खन्ना आणि विराट कोहली यांच्याप्रमाणे स्माईल फाऊंडेशनला मदत करत असतात. तेदेखील या डिनर पार्टीत लाईव्ह परफॉर्मन्स देऊन या चांगल्या कार्याला आपला हातभार लावणार आहेत. या लिलावातून येणारा सगळा पैसा हा मुलांच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी वापरण्यात येणार आहे.
![]()