भाच्याच्या डेब्यूसाठी अक्षय कुमारला सोडून डिंपल कपाडियाने घेतली सनी देओलची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:44 PM2019-03-05T15:44:19+5:302019-03-05T15:45:15+5:30

जान्हवी कपूर, सारा अली खान, करण देओल बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या स्टारकिड्सच्या यादीत आणखी एक नाव चढले आहे. होय, या स्टारकिडचे नाव आहे, करण कपाडिया.

dimple kapadias nephew karan kapadia is all set to make his bollywood debut with sunny deol in film blank | भाच्याच्या डेब्यूसाठी अक्षय कुमारला सोडून डिंपल कपाडियाने घेतली सनी देओलची मदत!

भाच्याच्या डेब्यूसाठी अक्षय कुमारला सोडून डिंपल कपाडियाने घेतली सनी देओलची मदत!

googlenewsNext
ठळक मुद्देबेहजद खंबाटा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

जान्हवी कपूर, सारा अली खान, करण देओल बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या स्टारकिड्सच्या यादीत आणखी एक नाव चढले आहे. होय, या स्टारकिडचे नाव आहे, करण कपाडिया. आता हा करण कपाडिया डिंपल कपाडियांचा कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर करण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.

आपल्या भाच्याच्या बॉलिवूड डेब्यूचा सगळा जिम्मा डिंपलकपाडिया यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता. करण कपाडिया लवकरच ‘ब्लँक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. खास गोष्ट म्हणजे, करणच्या या चित्रपटात सनी देओल हाही महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. आणखी एक खास बात सांगायची झाल्यास जीजू अक्षय कुमारची मदत न घेता करण सनी देओलसोबत आपल्या करिअरची सुरुवात करतोय.




बेहजद खंबाटा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट उघड झालेली नाही. पण सूत्रांचे मानाल तर येत्या ३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आधी हा चित्रपट गत ११ जानेवारीला रिलीज होणार होता. पण यानंतर अचानक ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली.
करणची आई सिंपल कपाडिया ही सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री होती. १९७७ मध्ये ‘अनुरोध’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.

Web Title: dimple kapadias nephew karan kapadia is all set to make his bollywood debut with sunny deol in film blank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.