जावई अक्षय कुमारला 'Gay' समजायच्या डिंपल कपाडिया, टेस्ट केल्यानंतरच लेकीच्या लग्नाला दिला ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:31 IST2023-06-08T16:12:10+5:302023-06-08T16:31:47+5:30

डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारसमोर ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती.

Dimple kapadia thought akshay kumar was gay married daughter twinkle khanna after genetic test | जावई अक्षय कुमारला 'Gay' समजायच्या डिंपल कपाडिया, टेस्ट केल्यानंतरच लेकीच्या लग्नाला दिला ग्रीन सिग्नल

जावई अक्षय कुमारला 'Gay' समजायच्या डिंपल कपाडिया, टेस्ट केल्यानंतरच लेकीच्या लग्नाला दिला ग्रीन सिग्नल

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डिंपल कपाडियाचं अनेक चित्रपट असे आहेत, जे आजही चर्चेत आहेत. डिंपल कपाडिया या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्या त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतात. डिंपल कपाडिया आज त्यांचा 66 व्या वाढदिवस साजरा करतायेत. डिंपल कपाडिया यांने जवाई अक्षय कुमारसोबत चांगले बॉन्डिग आहे. डिंपल आणि अक्षय कुमार यांच्यातला मजेदार किसा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


अक्षय कुमारच्या बाबतीतील मजेशीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्याची सासू म्हणजे ट्विंकल खन्नाची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सल्लादेखील दिला होता. एका शोमध्ये काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाने सांगितलं होतं की, तिच्या आईला अक्षय कुमार गे असल्याचे वाटायचे.

ट्विंकल खन्नाला एका पत्रकार मित्रानं सांगितलं होतं की अक्षय गे आहे. डिंपल कपाडियाने मुलीला सल्ला दिला की तू व अक्षय एक वर्ष एकत्र रहा आणि मग पुढे काय करायचं ते ठरवा. 

डिंपल कपाडिया बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसमोर यांनी ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती. त्याने सांगितले की, लग्नापूर्वी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी एक वर्ष एकत्र राहण्याची अट ठेवली होती. याशिवाय डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमार 'गे' आहे की नाही यासंदर्भात जेनेटिक स्टेट केली होती. यानंतरच त्यांनी  ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या लग्नासाठी होकार दिला. ही गोष्ट ट्विंकल खन्नाने करण जोहरच्या चॅटमध्ये सांगितली होती. 

Web Title: Dimple kapadia thought akshay kumar was gay married daughter twinkle khanna after genetic test