हिच्यासमोर सगळ्या फेल, स्टाईलच्या बाबतीत स्टारकिड्सना टक्कर देते डिंपल कपाडिया यांची नात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:58 IST2023-09-02T14:53:32+5:302023-09-02T14:58:19+5:30
सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात नाओमिका सरन भलतीच ग्लॅमरस आहे.

हिच्यासमोर सगळ्या फेल, स्टाईलच्या बाबतीत स्टारकिड्सना टक्कर देते डिंपल कपाडिया यांची नात
बॉलिवूडच्या फॅन्सला जवळजवळ सर्वच स्टारकिड्सबद्दल माहिती आहे. पण एका स्टारकिडवर कदाचित तुमचं लक्ष गेलं नसावं. होय, आम्ही बोलतोय ते सुपरस्टार राजेश खन्ना ( Rajesh Khanna) व डिंपल कपाडिया ( Dimple Kapadia )यांच्या नातीबद्दल. तिचं नाव, नाओमिका सरन (Naomika Saran). सध्या तिचीच चर्चा आहे. इंटरेनटवर तिचं नाव सर्च होत आहे.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची थोरली लेक रिंकी खन्ना हिच्याबद्दल तुम्हाला ठाऊक असेलच. रिंकीने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत डिनो मोरिया आणि संजय सूरी लीड रोलमध्ये होते. यानंतर मुझे कुछ कहना है, जिस देश में गंगा रहता है, झंकार बीट्स अशा सिनेमात दिसली. पण तिची जादू काही चालली नाही. अॅक्टिंगमध्ये आपलं फार काही खरं नाही, हे लक्षात आल्यावर रिंकीने लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. 2003 साली बिझनेसमॅन समीर सरनसोबत तिने लग्न केलं आणि विदेशात सेटल झाली. नाओमिका ही रिंकी व समीर सरन यांची लेक आहे.
रिंकी बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे पण तिची 18 वर्षांची मुलगी नाओमिकाची तिच्या स्टाईलमुळे. सौंदर्यामुळे आणि लूकमुळे चर्चेत असते. नाओमिका खूप स्टायलिश आहे आणि खूप सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. नाओमिका प्रचंड ग्लॅमरस आहे. आपल्या स्टाईलमुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. तिची स्टाईल, तिची ब्युटी पाहून अनेक चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.