दिलजीत दोसांझसोबत असलेल्या महिलेने बॉलिवूडला फटकारलं; फोटोमागील सत्य उलगडत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:24 AM2024-03-24T11:24:42+5:302024-03-24T11:25:25+5:30

दिलजीत दोसांझचं खरंच लग्न झालं आहे का? महिलेने बॉलिवूडलाच फटकारलं

Diljit Dosanjh viral photo with a woman what is truth behind it woman herself cleared confusion | दिलजीत दोसांझसोबत असलेल्या महिलेने बॉलिवूडला फटकारलं; फोटोमागील सत्य उलगडत म्हणाली...

दिलजीत दोसांझसोबत असलेल्या महिलेने बॉलिवूडला फटकारलं; फोटोमागील सत्य उलगडत म्हणाली...

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh)  मोठा चाहतावर्ग आहे. त्याने दिलेल्या मुलाखतींमधून अनेकदा त्याचा साधाभोळा स्वभाव दिसला. म्हणूनच दिलजीत चाहत्यांचा लाडका बनला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानींच्या पार्टीत त्याने आपल्या परफॉर्मन्सने हॉलिवूड स्टार गायिका रिहानालाही मागे टाकले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच्याबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती. दिलजीत विवाहित असल्याची आणि त्याला एक मुलगा असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लग्नाच्या लाल जोड्यातील एका महिलेबरोबरचा त्याचा फोटोही व्हायरल झाला होता. पण आता या मागचं सत्य स्वत: त्या फोटोतील महिलेनेच उलगडलं आहे.

दिलजीत दोसांझसोबत व्हायरल फोटोत जी महिला आहे तिचं नाव निशा बानो (Nisha Bano) आहे. ती सुद्धा पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहे. निशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो आणि यासंबंधी आलेल्या बातम्या शेअर केल्या. यासोबत तिने यामागचं सत्य सांगितलं. ती लिहिते, "हाहाहा कोणी मला सुद्धा विचारा. ही बातमी खूप व्हायरल होत आहे आणि सगळे मला व्हिडिओ, फोटोत टॅग करत आहे. शेअर करत आहेत. पण पंजाबी लोकांना माहित आहे की मी समीर माहीची पत्नी आहे. आता हे बॉलिवूडला कोण समजवणार."

दिलजीतच्या लग्नाची चर्चा सुरु झाली ती किआरा अडवाणीच्या एका जुन्या मुलाखतीतून. गुडन्यूज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिने मी सोडून सगळे इथे विवाहित आहेत त्यांना मुलं आहेत असं सांगितलं होतं. तेव्हा किआरासोबत अक्षय कुमार, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ ही सिनेमाची कास्ट होती. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झााल आणि दिलजीत विवाहित असून त्याला एक मुलगा असल्याची बातमी व्हायरल झाली. इतकंच नाही तर त्याची पत्नी आणि मुलगा अमेरिकेत राहतात हेही पसरलं. पण आता फोटोतील महिला निशा बानोने सगळा गोंधळ दूर केला आहे. 

Web Title: Diljit Dosanjh viral photo with a woman what is truth behind it woman herself cleared confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.