दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३'मध्ये पाक अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:53 IST2025-06-09T09:53:00+5:302025-06-09T09:53:52+5:30

पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी 3'मधून पाक अभिनेत्री हानिया आमिरला वगळण्यात आलं नसल्याचं काही नेटकरी म्हणत आहे. दिलजीतनं नुकतंच शेअर केलेले BTS फोटो पाहून नेटकरी हा दावा करत आहेत.

Diljit Dosanjh Shares Bts Photos From Sardaarji 3 Set Fans Spotted Pakistani Actress Hania Aamir | दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३'मध्ये पाक अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल

दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३'मध्ये पाक अभिनेत्री हानिया आमिर? BTS फोटो व्हायरल

पंजाबी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'सरदारजी ३' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच त्याने या चित्रपटाच्या सेटवरील काही बीटीएस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे सध्या सगळीकडे पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिची चर्चा सुरू झाली आहे.  दिलजीतच्या चित्रपटात हानिया खरोखरच दिसणार आहे का? असा प्रश्न नेटकरी उपस्थित होत आहे.

अभिनेत्यानं नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंजाबी चित्रपटसृष्टीतील आवडती जोडी नीरू बाजवा आणि दिलजीतची केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसली. पण मनोरंजक गोष्ट अशी होती की काही वापरकर्त्यांनी या फोटोंमध्ये हानिया आमिरला 'स्पॉट' केलं. एका फोटोमध्ये, दिलजीतसोबत काळी साडी घातलेली एक मुलगी दिसली, जिच्याबद्दल चाहते दावा करत आहेत की ती दुसरी कोणी नसून हानिया आमिर आहे. यासोबतच, दुसऱ्या फोटोमध्ये दिसणारे डोळे आणि केस पाहून चाहत्यांना ती देखील हानिया असल्याचा अंदाज बांधलाय. चाहते दिलजीतच्या पोस्टवर कमेंट करत 'हानिया या चित्रपटात आहे का?' असे विचारत आहेत. 


पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

खरं तर, एप्रिल २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर, पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीत, हानिया आमिरला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आलं होतं.  तथापि, चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे?

'सरदार जी ३' बद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा टीझर लवकरच प्रदर्शित आहे. दिलजीत दोसांझ आणि नीरू बाजवा यांच्या जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच खूप क्रेझ आहे. पण आता जर हानिया आमिर या चित्रपटाचा भाग असेल तर नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Diljit Dosanjh Shares Bts Photos From Sardaarji 3 Set Fans Spotted Pakistani Actress Hania Aamir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.