दिलीप कुमार यांची अखेरची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:01 IST2021-07-07T19:00:49+5:302021-07-07T19:01:32+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

Dilip Kumar's last 'this' wish remained unfulfilled, find out about it | दिलीप कुमार यांची अखेरची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण, जाणून घ्या याबद्दल

दिलीप कुमार यांची अखेरची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण, जाणून घ्या याबद्दल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत. संध्याकाळी ५ च्या सुमारास दिलीप कुमार यांच्यावर सांताक्रुझ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र त्यांची शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

दिलीप कुमार यांचे त्यांच्या आई-वडिलांवर नितांत प्रेम होते. त्यांच्या आई-वडिलांचे दफनविधी नाशिकमधील देवळी येथे करण्यात आले होते. त्याच ठिकाणी किंवा पालकांच्या शेजारीच त्यांचा देखील दफनविधी व्हावा अशी त्यांची इच्छा होती.

विशेष बाब म्हणजे आपली ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालकांच्या कबरीशेजारीच त्यांनी स्वत:साठी देखील एक राखीव जागा आधीच बुकिंग करून ठेवली होती. आई-वडिलांच्या सानिध्यात त्यांना अनंतात विलीन व्हायचे होते. मात्र त्यांची ही इच्छा शेवटी अपूर्णच राहिली.

सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी देवळी इथे त्यांच्या दफनविधीची तयारीदेखील केली होती. मात्र त्यांची पत्नी सायरा बानो यांनी त्यांना नकार दिला. त्यांनी जुहू येथील कब्रिस्तानात त्यांचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या या निर्णयामुळे दिलीप कुमार यांची अखेरची इच्छा शेवटी अपूर्णच राहिली.

Web Title: Dilip Kumar's last 'this' wish remained unfulfilled, find out about it