दिलीप कुमार यांनी फक्त १२ लाखांत साइन केला होता शेवटचा सिनेमा, मागे ठेवली इतक्या कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:22 PM2021-07-07T12:22:16+5:302021-07-07T12:22:45+5:30

बॉलिवूडमधील अभिनेते दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

Dilip Kumar had signed the last movie for only Rs 12 lakh, leaving behind assets worth crores | दिलीप कुमार यांनी फक्त १२ लाखांत साइन केला होता शेवटचा सिनेमा, मागे ठेवली इतक्या कोटींची मालमत्ता

दिलीप कुमार यांनी फक्त १२ लाखांत साइन केला होता शेवटचा सिनेमा, मागे ठेवली इतक्या कोटींची मालमत्ता

googlenewsNext

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ११ डिसेंबर, १९२२ साली पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव युसुफ खान होते. सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा देविका राणी यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६२ सिनेमात काम केले. त्यांनी शेवटचा सिनेमा फक्त १२ लाख रुपयात साइन केला होता आणि त्यांना पूर्ण रक्कम कॅशमध्ये मिळाली होती. हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.


मीडिया पोर्टल सेलिब्रेटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांची संपत्ती जवळपास ८.५ कोटी डॉलर इतकी आहे. हे रुपयात सांगायचे तर ६३४.२१ कोटी रुपये होते. दिलीप कुमार यांचे इन्कम सोर्सचे स्त्रोत अभिनयच आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते.

दिलीप कुमार त्यांच्या काळात सर्वाधीक मानधन घेणार कलाकार होते. १९५०च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेत होते. ही रक्कम त्याकाळात खूप जास्त होती.


इतर कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. मात्र दिलीप कुमार यांना झगमगाटीपासून दूर रहायला आवडत होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांनी एकदा सांगितले होते की त्यांचे कपडे ते पाली नाका येथील एका टेलरकडून शिवतात. हा टेलर तेव्हापासून त्यांचे कपडे शिवत होता जेव्हा ते वांद्रे येथे राहत होते.

Web Title: Dilip Kumar had signed the last movie for only Rs 12 lakh, leaving behind assets worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.