VIDEO : सायरा बानो नि:शब्द...! रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळत राहिल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:14 IST2021-07-07T11:00:52+5:302021-07-07T11:14:04+5:30

VIDEO : आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

dilip kumar death funeral at 5pm in mumbai to be taken home first | VIDEO : सायरा बानो नि:शब्द...! रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळत राहिल्या...

VIDEO : सायरा बानो नि:शब्द...! रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळत राहिल्या...

ठळक मुद्दे1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी   विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी  लहान होत्या.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांचे पार्थिव रूग्णालयातून त्यांच्या पाली हिल स्थित घरी नेण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. प्राप्त माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

(साभार)

रूग्णवाहिकेतून दिलीप कुमार यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी पत्नी सायरा बानो (Saira Banu) दिलीप कुमार यांच्या पार्थिवासमोरच्या सीटवर बसलेल्या दिसल्या. त्यांची एक झलक मीडियाच्या कॅमे-यात दिसत आहेत. सायरा आणि दिलीपकुमार यांना मूल नाही. त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं पसंत केलं. सायरा अगदी शेवटपर्यंत सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्या सोबत राहिल्या. शेवटपर्यंत त्यांची सेवा केली. अगदी लहान मुलासारखी पतीची काळजी घेतली.

(साभार)

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

(साभार)

1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी   विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी  लहान होत्या. सायरा यांनीही काही चित्रपटांत काम केलं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतरच म्हणजेच 1981 साली दिलीप यांनी आस्मा साहिबा  यांच्याशी विवाह केला मात्र सायरा या दिलीप यांच्यासोबतच होत्या. काहीच दिवसांत हे दुसरं लग्नही मोडंल. व दिलीप आणि आस्मा यांनी घटस्फोट घेतला. दिलीप कुमार यांच्या अफेअर्सचाही सायरा आणि दिलीप यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही.

 

Web Title: dilip kumar death funeral at 5pm in mumbai to be taken home first