आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:04 IST2023-03-24T14:56:44+5:302023-03-24T15:04:49+5:30

Ajay Devgn’s Bholaa, Dil Hai Bholaa Song Out: अजय, तब्बू, संजय मिश्रा, गजराज राव अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘भोला’ हा सिनेमा येत्या ३० मार्चला चित्रपटगृहांत धडकणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झालाये.

Dil Hai Bholaa Aaj Phir Jeene Ki Tamanna Hai Song From Ajay Devgn’s Bholaa Is Out | आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!

आज फिर जिने की...! अजयच्या ‘Bholaa’चं ‘हे’ गाणं ऐकून चाहते म्हणाले, उफ्फ खतरनाक...!!

Dil Hai Bholaa Song Out: अजय देवगणच्या ‘भोला’ (Ajay Devgn’s Bholaa) या सिनेमाची सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. अजयचे चाहते ‘भोला’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय, तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, गजराज राव अशी दमदार स्टारकास्ट असलेला हा सिनेमा येत्या ३० मार्चला चित्रपटगृहांत धडकणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झालाये. खरं तर मेकर्सनी या गाण्याला दिल है भोला हे नाव दिलंय. पण या गाण्यातील आज फिर जीने की तमन्ना है ही एक ओळ काळजाला भिडणारी आहे.

अमित मिश्राने गायलेलं आणि इर्शाद कामिल यांनी शब्दबद्ध केलेलं ‘भोला’चं हे गाणं पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. आधी ‘भोला’चा ट्रेलर, मग एका ॲक्शन सीन्स बीटीएस व्हिडीओ आणि आता हे गाणं पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर हे गाणं पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. उफ्फ खतरनाक, फाड दिया बॉस, बाप रे बाप... अशा कमेंट युजर्सनी केल्या आहेत.

'भोला' या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.  रिलीजआधीच 'भोला'ने ॲडव्हान्स बुकिंगमधून तीन दिवसांत सुमारे 1 कोटींची बंपर कमाई केली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला होता त्यात साऊथ स्टार कार्थी मुख्य भूमिकेत होता. २५ कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कैथी’ने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा बिझनेस केला होता. आता याचाच रिमेक असलेला अजयचा ‘भोला’ किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Dil Hai Bholaa Aaj Phir Jeene Ki Tamanna Hai Song From Ajay Devgn’s Bholaa Is Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.