‘दिल बेचारा’ आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ऑनलाईन हिट, काही तासात मिळाले इतके कोटी व्ह्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 11:29 IST2020-07-26T11:26:11+5:302020-07-26T11:29:52+5:30
सुशांतच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा...

‘दिल बेचारा’ आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ऑनलाईन हिट, काही तासात मिळाले इतके कोटी व्ह्यूज
सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही. आता तो कधीच परतायचा नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्या शुक्रवारी त्याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ रिलीज झाला आणि त्याचा हा सिनेमा पाहून चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. डिस्री प्लस हॉटस्टारवर ‘दिल बेचारा’ रिलीज झाला आणि रिलीज होताच चाहत्यांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्यात. इतक्या की, सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हॉटस्टार क्रॅश झाले होते.
A film that will always be etched in the hearts of all Bollywood fans. Your love has made Dil Bechara the biggest movie opening. Ever. #DisneyPlusHotstar#Lovebreaksrecords#DilBechara#DisneyPlusHotstarMultiplexpic.twitter.com/dwrnmumjVd
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) July 25, 2020
सर्वात मोठी ओपनिंग
डिज्नी प्लस हॉटस्टारने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर ‘दिल बेचारा’बद्दल एक ट्विट केले आहे. ‘एक सिनेमा जो बॉलिवूड चाहत्यांच्या मनात कायम राहील. तुमच्या प्रेमाने दिल बेचारा या सिनेमाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग असलेला सिनेमा बनवला आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद,’ असे ट्विट डिज्नी प्लस हॉटस्टारने केले आहे.
‘दिल बेचारा’ला IMDb वर 9.6 रेटींग मिळाले आहे. चित्रपटाच्या रिलीजवेळी हे रेटींग 10/10 होते, जो एक विक्रम आहे.
18 तासांत या सिनेमाला 7.5 कोटी व्ह्यूज
अद्याप रिपोर्ट येणे बाकी आहे. मात्र ‘दिल बेचारा’ ओटीटीवरचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. 18 तासांत या सिनेमाला 7.5 कोटी व्ह्युज मिळालेत. ओटीटीवरचे हे व्ह्यूज एक विक्रम असल्याचे मानले जात आहेत.
फोटोग्राफर विरल भयानीने हे आकडे शेअर केले आहेत. त्याने लिहिले, ‘हॉटस्टारने अद्याप चित्रपटाच्या व्ह्युजचा अधिकृत आकडा जारी केलेला नाही. पण 18 तासांत या सिनेमाला 7.5 कोटी व्ह्यूज मिळाल्याचे मानले जात आहे. ओटीटी इतिहासात हा सर्वात मोठा सिनेमा आहे.’
शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता ‘दिल बेचारा’ रिलीज झाला होता. हॉटस्टारवर कुठल्याही सब्सक्रिप्शनशिवाय म्हणजेच फ्री हा सिनेमा रिलीज केला गेला. यामुळे ‘दिल बेचारा’चे व्ह्यूज वाढत आहेत.
दिल बेचारा मॅनी आणि किझी या दोन किशोरवयीन मुलांची प्रेमकथा आहे, ज्यांच्या आयुष्यात काही घटना घडून गेल्या आहेत, मात्र तरीही त्यांना आयुष्य जगण्याची इच्छा आहे. एकमेकांना भेटून दोघांना पुन्हा एकदा जगण्याचे कारण मिळते. सिनेमात सुशांत सिंह राजपूत (मॅनी), संजना सांघी (किजी बासू), सैफ अली खान (आफताब खान), साहिल वैद्य, जावेद जाफरी, मिलिंद गुणाजी, स्वस्तिका मुखर्जी यांच्या भूमिका आहेत.