सनी लियोनीचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 11:26 IST2017-10-30T05:56:31+5:302017-10-30T11:26:31+5:30
सनी लियोनी हे नाव बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आले. सनी पॉर्नस्टार असूनही बिग बॉसच्या घरात तिचा प्रवेश झाला ...
.jpg)
सनी लियोनीचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?
स ी लियोनी हे नाव बिग बॉस या कार्यक्रमामुळे नावारूपाला आले. सनी पॉर्नस्टार असूनही बिग बॉसच्या घरात तिचा प्रवेश झाला होता. बिग बॉसमुळे तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने जिस्म २ या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर शुटआऊट अॅट वडाळा, रागिनी एमएमएस २, हेट स्टोरी २, सिंग इज ब्लिंग यांसारख्या चित्रपटात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. यातील तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सनी लियोनी ही एक आयटम गर्ल म्हणून देखील ओळखली जाते. सनी लियोनीवर चित्रीत करण्यात आलेले बेबी डॉल साँग तर खूपच गाजले होते. सनीने जिस्म २ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी या चित्रपटाच्या काही वर्ष आधीच तिला बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली होती. पण काही कारणाने त्यावेळी तिचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. कलयुग हा मोहित सुरीचा चित्रपट तिला ऑफर करण्यात आला होता. पण सनीने जास्त पैसे मागितल्यामुळे ती डील फिस्कटली आणि या चित्रपटासाठी दुसऱ्या नायिकेची निवड कऱण्यात आली. कलयुग या चित्रपटानंतर जवळजवळ सात वर्षांनी आपल्याला सनीला बॉलिवूडच्या चित्रपटात पाहायला मिळाले.
सनीचे खरे नाव हे करणजीत कौर वोहरा असून ती एक पंजाबी आहे. तिला लहानपणापासूनच बॉलिवूडचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. आमिर खान हा तिचा आवडता अभिनेता असून त्याचा दिल हा चित्रपट पाहिल्यावर त्याच्यावर फिदा झाली होती.
![sunny leone childhood picture]()
सनी ही तिच्या गाण्यांसाठी, नृत्यांसाठी ओळखली जाते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेली अनेक गाणी पार्टींमध्ये लावली जातात. पण असे असले तरी सनीला स्वतःला पार्टींना जायला आवडत नाही. त्यापेक्षा तिला घरी बसून पुस्तकं वाचायला आवडतात.
सनीचे आज लग्न डॅनियल वेबरसोबत झाले असले तरी प्लेबॉय या मासिकाचा मार्केटिंग व्हाईज प्रेसिडेंट मॅट एरिक्सन याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला होता. एवढेच नव्हे तर प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटरसोबतही ती काही काळ नात्यात होती.
Also Read : सनी लियोनी प्रमाणेच हे स्टारदेखील होते पॉर्न स्टार