'कबीर सिंग'मधील शाहिद कपूरचा लूक पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:45 IST2018-11-26T18:39:23+5:302018-11-26T18:45:22+5:30
'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

'कबीर सिंग'मधील शाहिद कपूरचा लूक पाहिलात का?
अभिनेता शाहिद कपूरचा काही महिन्यांपूर्वी 'बत्ती गुल मीटर चालू' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर इतका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात शाहिद सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या सिनेमानंतर आता तो दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव कबीर सिंग असणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शाहिदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शाहिद कपूरने इंस्टाग्रामवर कबीर सिंग चित्रपटाच्या सेटवरील त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यात तो क्लीन शेव्हमध्ये दिसतो आहे. ‘अर्जुन रेड्डी’च्या या हिंदी रिमेकचे नाव कबीर सिंग असे आहे. मूळ चित्रपट मस्त जमला आणि बॉक्स ऑफीसवर तो हिटही झाला आहे त्यामुळे खरेतर या चित्रपटाचा रिमेक व्हायलाच नको, हेच आपले मत होते असे तो सांगतो. मात्र हा चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर आपण ती करायला हवी, हा विचार स्पर्शून गेला आणि म्हणूनच या चित्रपटाला होकार दिल्याचे त्याने सांगितले. या रिमेकमध्ये शाहिदसोबत अभिनेत्री कियारा अाडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'कबीर सिंग' हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. गेल्या आठवड्यापासून शाहिदने ‘कबीर सिंग’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मुंबई- दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात शाहिद वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. यात त्याचे चार लूक पाहायला मिळणार आहेत आणि शाहरूख गेल्या तीन महिन्यापासून या भूमिकेच्या तयारीला लागला आहे. शाहिद सोबत या चित्रपटात कियारा अाडवाणी दिसणार आहे. 'एम.एस. धोनी', 'लस्ट स्टोरी'मध्ये कियाराने काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा, शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शाहिदचे चाहते 'कबीर सिंग' चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.