​सिद्धार्थ मल्होत्राच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 12:34 IST2017-04-07T07:04:45+5:302017-04-07T12:34:45+5:30

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘अय्यारी’या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आणि पहिल्याच नजरेत या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Did you see the new poster of Siddharth Malhotra? | ​सिद्धार्थ मल्होत्राच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर तुम्ही पाहिलेत?

​सिद्धार्थ मल्होत्राच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर तुम्ही पाहिलेत?

िनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘अय्यारी’या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आणि पहिल्याच नजरेत या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर येणा-या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचा धमाका करणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात  सिद्धार्थ आणि मनोज वाजपेयी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.


ALSO READ : ​सिद्धार्थ मल्होत्राच्या केसांनी केली ‘रिलोडेड’च्या मेकर्सची गोची!

या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित असल्याचे कानावर आले असले तरी नक्की कोणत्या घटनेला पांडे पडद्यावर आणणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहिले असता प्रथमदर्शनी ‘अय्यारी’ अंडरवर्ल्डशी निगडीत असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. पण आमचे मानाल तर, हा चित्रपट दोन व्यक्तिंची कथा आहे.  सूत्रांच्या मते,महेन्द्र सिंह धोनीच्या बायोपिकनंतर नीरज पांडे यांना वेगळे काही करायचे होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या चित्रपटासाठी ही आगळीवेगळी सत्यकथा निवडली.  दिल्ली, मुंबई आणि काश्मिरात या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. येत्या मे पर्यंत हे शूटींग पूर्ण करण्याचा मेकर्सचा मानस आहे.
 ‘अय्यारी’चा फर्स्ट लूक आणि एकंदर स्टारकास्ट पाहता नीरज पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत, ‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘बेबी’, ‘स्पेशल २६’ असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट सादर करणारे नीरज पांडे यांची कलाकारांची निवड बदलल्याचेही जाणवते आहे. अक्षय कुमारशिवाय अन्य कलाकारांसोबत काम करण्याची तयारी जणू त्यांनी केली आहे. आपल्या याआधीच्या चित्रपटात त्यांनी सुशांतसिंह राजपूतला कास्ट केले होते. आता त्यांनी सिद्धार्थची निवड केली आहे. 

Web Title: Did you see the new poster of Siddharth Malhotra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.