जॉन अब्राहमच्या अलिशान घराचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:23 IST2017-12-18T07:53:18+5:302017-12-18T13:23:18+5:30
जॉन अब्राहमने आज बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने एक मॉडेल म्हणून त्याच्या कारकिर्दीला ...
.jpg)
जॉन अब्राहमच्या अलिशान घराचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
ज न अब्राहमने आज बॉलिवूडमध्ये एक अभिनेता म्हणून त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने एक मॉडेल म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मॉडेल म्हणूनच त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याने जिस्म या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली.
![john abraham house pics]()
जिस्म या त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. पहिल्याच चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. त्याला या चित्रपटासाठी सर्वोत्तम नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.
![john abraham house pics]()
त्यानंतर साया, पाप, धूम, वॉटर, काबूल एक्सप्रेस न्यूयॉर्क, फोर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने एकाहून एक सरस भूमिका साकारल्या. त्याने एक अभिनेता म्हणून आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर तो निर्मितीकडे वळला. विकी डोनर, मद्रास कॅफे या त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे देखील प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी दोघांनीही कौतुक केले.
![john abraham house pics]()
जॉन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत असून त्याने त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. जॉनने काही वर्षांपूर्वी वांद्रेतील बँड स्टँड या परिसरात एक घर घेतले होते. विला इन द स्काई असे त्याच्या घराचे नाव असून हा लॅव्हिश ड्युप्लेक्स फ्लॅट आहे.
![john abraham house pics]()
जॉनचे हे घर ५००० Sqft चे असून या घरात सगळ्या अध्यावत सुविधा आहेत. या घराचे इंटेरियर देखील खूपच चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे. या घराच्या इंटेरियर करण्यात जॉनच्या कुटुंबियांनी स्वतः लक्ष दिले आहे. हे इंटेरियर जॉनचे वडील अब्राहम जॉन आणि भाऊ एलनने केले आहे.
![john abraham house pics]()
त्याच्या या घराचे इंटेरियर करण्यासाठी जवळजवळ १३-१४ महिने लागले होते. त्याच्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या घरातील प्रत्येक खोलीतून समुद्र दिसतो. या घराचे टेरेस देखील खूपच छान आहे. या घराचे इंटेरियर पाहून तुम्ही नक्कीच जॉनच्या या घराच्या प्रेमात पडाल.
![john abraham house pics]()
जॉनने हे घर घेतले त्यावेळी तो केवळ एक जुना फ्लॅट होता. हे जॉनचे घर सातव्या आणि आठव्या मजल्यावर असून जॉनने हे घर विकत घेतल्यावर या घराचा पूर्णपणे कायापालट केला.