‘बेबी डॉल’ सनी लिओनी व अरबाज खानच्या ‘तेरा इंतजार’चा ट्रेलर तुम्ही पाहिलातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:52 IST2017-10-26T10:22:45+5:302017-10-26T15:52:45+5:30
सनी लिओनी व अरबाजच्या ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. उण्यापु-या दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सनी अरबाजसोबत रोमान्स करताना दिसतेय.

‘बेबी डॉल’ सनी लिओनी व अरबाज खानच्या ‘तेरा इंतजार’चा ट्रेलर तुम्ही पाहिलातं?
ब लिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव तुम्हाला ठाऊक असणारच. होय, ‘तेरा इंतजार’. या चित्रपटात सनी लिओनी अभिनेता अरबाज खानच्या आयुष्यातील मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसणार आहे. सनी लिओनी व अरबाजच्या या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. उण्यापु-या दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सनी अरबाजसोबत रोमान्स करताना दिसतेय. दोघांचेही बोल्ड व किसींग सीन्सची भरमार या ट्रेलरमध्ये आहे. ‘तेरा इंतजार’मध्ये सनीचा प्रियकर बनलेला अरबाज चित्रकाराच्या भूमिकेत आहे. अरबाजला स्वप्नात एक मुलगी दिसते आणि अरबाज तिचेच चित्र काढतो. हीच मुलगी एकदिवस अचानक अरबाज समोर येऊन उभी राहते, असे ट्रेलरमध्ये दिसतेय. यानंतर दोघांचेही प्रेम बहरत असताना अरबाज एकदिवस अचानक बेपत्ता होतो आणि सनी त्याला शोधत सुटते, असेही यात दिसतेय. ट्रेलर बघता या चित्रपटात सनीचा एक वेगळा अवतार आपल्याला पाहायला मिळणार असे दिसतेय. तेव्हा तुम्हीही बघा आणि सनीचा हा वेगळा अवतार आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.
ALSO READ: ‘नवरात्री स्पेशल’ कंडोम जाहिरातीवर अखेर सनी लिओनीने उघडले तोंड; वाचा, काय दिले उत्तर!!
कथेबद्दल सांगायचे तर या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती भासतेय. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी या चित्रपटाची कथा असल्याचे कळतेय.
‘रागिनी एमएमएस2’मधील सनीचे ‘बेबी डॉल’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात सनी ‘सेक्सी बार्बी गर्ल’ या आयटम नंबरवर थिरकताना दिसणार आहे.
दिग्दर्शक राजीव वालिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गौहर खान आणि आर्य बब्बर असून या चित्रपटाची निर्मिती अमन मेहता आणि बिजल मेहता यांनी केली आहे. ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.