आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधील ईशान अवस्थी आता झालाय इतका मोठा, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:46 IST2022-03-09T06:00:00+5:302022-03-09T11:46:07+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर'मध्ये ईशानची भूमिका साकारणार बालकलाकार आता मोठा झालाय.

Did you see Aamir Khan's 'Taare Zameen Par's child actor now see his latest photo | आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधील ईशान अवस्थी आता झालाय इतका मोठा, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क

आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधील ईशान अवस्थी आता झालाय इतका मोठा, लेटेस्ट फोटो पाहून व्हाल थक्क

अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर'मध्ये ईशानची भूमिका साकारणार बालकलाकार आता मोठा झालाय.  २००७ साली रिलीज झालेल्या या चित्रपटात त्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन आता 15 वर्षे झाली आहे. 

'तारे जमीन पर'मधील ईशान म्हणजेच दर्शील सफारी आता मोठा झालाय. आज दर्शील आपला 25 वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्याचे लेटेस्ट फोटो बघून चाहते थक्क झालेत.आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्शीलला 2008 मध्ये सर्वात कमी वयात फिल्मफेरचा बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला होता. 


'तारे जमीं पर' नंतर दर्शीलनं 'बमबम बोले', 'जोकोमोन', 'मिडनाइट्स चिल्ड्रेन' या चित्रपटांमध्ये काम केलं. दर्शीलनं टीव्ही शो मध्येही काम केलंय. 'सुन यार ट्राय मार' आणि कलर्स टिव्हीचा डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमध्ये दिसला. तसेच तो काही जाहिरातींमध्येही झळकला.

Web Title: Did you see Aamir Khan's 'Taare Zameen Par's child actor now see his latest photo