ओळखलंत का चिमुरड्याला?, आईच्या कडेवर असलेला हा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:27 IST2023-10-30T16:21:34+5:302023-10-30T16:27:05+5:30
फोटोतील आईच्या कडेवर असलेला हा निरागस मुलगा कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.

ओळखलंत का चिमुरड्याला?, आईच्या कडेवर असलेला हा मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार
गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोतील आईच्या कडेवर असलेला हा निरागस मुलगा कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तुम्हाला एक हिंट देतो, या मुलाने यावर्षात सुपरहिट चित्रपट दिला आहे, हा आज बॉलिवूडचा मोठा स्टार बनला आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींबरोबर त्याने काम केलं आहे.
इतकेच नाही तर हा चिमुकला आज दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही पहिली पसंती बनला आहे. आईच्या कडेवर असलेला हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव आज इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत सामील झाले आहे. हा चिमुकला आज दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही पहिली पसंती बनला आहे.
कार्तिक आर्यनने प्यार का पंचनाम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कार्तिकला खरी ओळख मिळाली ती ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून. यानंतर कार्तिकने एकापाठोपाठ अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या सत्य प्रेम कथा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला होता.