​प्रियांकाच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याला तुम्ही भेटलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:41 IST2016-11-18T17:39:51+5:302016-11-18T17:41:49+5:30

प्रियांकाच्या घरी नवा पाहुणा आला आहे. तुम्ही लगेच भलता सलता अर्थ काढायला नको, म्हणून आम्ही आधीच सांगतो. होय, हा पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून एक पपी आहे. होय, प्रियांकाने त्याचे नाव ‘डायना’ ठेवले आहे.

Did you meet the new guest at Priyanka's house? | ​प्रियांकाच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याला तुम्ही भेटलात का?

​प्रियांकाच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याला तुम्ही भेटलात का?

रियांकाच्या घरी नवा पाहुणा आला आहे. तुम्ही लगेच भलता सलता अर्थ काढायला नको, म्हणून आम्ही आधीच सांगतो. होय, हा पाहुणा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून एक पपी आहे. होय, प्रियांकाने त्याचे नाव ‘डायना’ ठेवले आहे. केवळ डायनाच नाही तर डायनाला खेळायला एक रोबोटिक पपीही प्रियांकाच्या घरात दाखल झाला आहे. प्रियांका आॅफिशिअली सिंगल आहे. प्रियांका कुणासोबत रोमॅन्टिकली लिंकअप असल्याची बातमी अलीकडे तरी आलेली नाही. त्यामुळे कधीमधी प्रियांकालाही एकटेपण खायला उठत असणार हे नक्की. पण आता तिला डायनाच्या रूपात एक चांगला साथीदार मिळालाय. प्रियांका सध्या डायनात गुंतून गेली आहे. डायनाची पुरेपूर काळजी घेताना ती दिसतेय. इतकी की, त्याच्यासोबत खेळायला प्रियांकाने एक रोबोटिक पपीही आणला आहे. या रोबोटिक पपीला पीसीने ‘जूमर’ असे नाव दिला आहे. प्रियांकाने डायना आणि जूमरचा एक व्हिडिओ अलीकडे चाहत्यांशी शेअर केला. यात क्यूट डायना धम्माल मस्ती करताना दिसतोय. जूमरला पाहून त्याचे घाबरणे, बावरणे सगळेच मजेशीर आहे.
प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनचे शूटींग सध्या ती करतेय. लवकरच तिचा ‘बेवॉच’ हा पहिला-वहिला हॉलिवूड सिनेमाही प्रदर्शित होतो आहे. याशिवाय प्रियांका तिच्या होम प्रॉडक्शन चित्रपटांमध्येही बिझी आहे. प्रियांका निर्मित ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी सिनेमा अलीकडे प्रदर्शित झाला. यानंतर तिच्या होम प्रॉडक्शन ‘सरवन’ हा पंजाबी चित्रपट लवकरच रिलीज होतोय. एकंदर काय तर पीसीची गाडी सध्या सूसाट पळतेय. अशावेळी काही क्षणाचा निवांतपणा लागतोय. कदाचित डायनासोबत असेच काही निवांत क्षण प्रियांका घालवू इच्छिते.

 


 

Web Title: Did you meet the new guest at Priyanka's house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.