शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 08:00 IST2022-12-25T08:00:00+5:302022-12-25T08:00:02+5:30
फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या शाळेच्या ड्रेसमधील सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का?

शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखलंत का तिला?
वरील फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्हाला ओळखता येत आहे का? नाही....? चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत आहे, इतकेच नाही तर अलीकडेच या अभिनेत्रीने अनेक वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे आणि सध्या ती एका शोला जज करत आहे.
खरं तर, या सात मुलींमध्ये टॉप लाईनच्या मध्यभागी उभी असलेली मुलगी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. हा थ्रोबॅक फोटो स्वत: शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत उभी आहे. या फोटोमध्ये शिल्पानेही पांढऱ्या रंगाचा शाळेचा ड्रेसमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे.
शिल्पा शेट्टी ही कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमासाठी ती 1 ते 2 कोटी रुपये मानधन आकारत होती. टीव्हीवरील रिअॅलिटी शो जज करण्यासाठी शिल्पा शेट्टी एपिसोडप्रमाणे 17 ते 18 लाख मानधन घेते. सिनेमांशिवाय जाहिराती आणि ब्रँड एन्डॉर्समेंटही आहेत. अलिशान आयुष्य जगणारी शिल्पा शेट्टी एकूण 134 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.