‘संजू’चे नवे गाणे ‘रूबी रूबी’ तुम्ही ऐकलेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:34 IST2018-06-20T07:04:40+5:302018-06-20T12:34:40+5:30
संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटातील ‘रूबी रूबी’ या गाण्याचे आॅडिओ व्हर्जन जारी झालेय. संगीताचे जादूगार ए़ आऱ रहमान यांनी हे गाणे कम्पोज केले आहे तर बोल इरशाद कामिल यांचे आहेत.

‘संजू’चे नवे गाणे ‘रूबी रूबी’ तुम्ही ऐकलेत?
स जय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटातील ‘रूबी रूबी’ या गाण्याचे आॅडिओ व्हर्जन जारी झालेय. संगीताचे जादूगार ए़ आऱ रहमान यांनी हे गाणे कम्पोज केले आहे तर बोल इरशाद कामिल यांचे आहेत. मुळात सुफी बाज असलेल्या या गाण्याला शाश्वत सिंह आणि पूर्वी कोतिश यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. हे गाणे ऐकून तुम्हीही भान विसराल हे नक्की. नाराजी इतकीच की, तूर्तास मेकर्सने या गाण्याचे केवळ आॅडिओ व्हर्जन जारी केले आहे. लवकरच याचे व्हिडिओ व्हर्जन जारी होईल ही आशा करूयात.
आॅडिओ व्हर्जन ऐकल्यानंतर हे गाणे संजय दत्तचे खरे प्रेम आणि त्याचा शोध यावर बेतलेले असल्याचे भासते.
या गाण्यापूर्वी ‘संजू’ची दोन गाणी ‘बढिया बढिया’ आणि ‘कर हर मैदान फतह’ रिलीज झाली आहेत. ही दोन्ही गाणी संगीतप्रेमींच्या पसंतीत उतरली आहते. पहिल्या ‘बढिया बढिया’ गाण्यात संजय दत्तच्या युवा दिनांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तर ‘कर हर मैदान फतह’मध्ये संजयचे ड्रग्जचे व्यसन आणि या व्यसनाशी त्याने दिलेला लढा दाखवण्यात आला आहे.
ALSO READ : Exclusive ! राजकुमार हिरानीच्या आधी संजूसाठी 'या' व्यक्तिने रणबीरची केली होती निवड
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ नावाचा हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तूर्तास या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत.