अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 18:31 IST2019-08-30T18:30:33+5:302019-08-30T18:31:26+5:30
प्रेक्षकांची लाडकी आथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुलच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे.

अथिया शेट्टीला विक्रम फडणवीसने चिडवले लोकेश राहुलवरून... तिने दिली यावर अशी प्रतिक्रिया
सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तिच्या हिरो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन बॉलिवूडमधील दिग्गजांनी केले होते. सुनील आणि सलमान खानची फ्रेंडशिप खूप जुनी असून सलमाननेच आथियाला बॉलिवूडमध्ये लाँच केले. आथियाचा हा चित्रपट प्रेक्षकांना तितकासा आवडला नसला तरी या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला दादा साहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर ती मुबारकाँ या चित्रपटात देखील झळकली होती. आता तिचा मोतीचूर चकनाचूर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रेक्षकांची लाडकी आथिया आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुलच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे. त्या दोघांना नुकतेच एका कार्यक्रमात एकत्र पाहाण्यात आले होते. तेव्हापासूनच यांच्यात मैत्रीपेक्षा काही तरी अधिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच आता फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अथियाला चिडवण्याच सुरुवात केली आहे. पण ही गोष्ट आथियाला रूचली नसल्याचे तिच्या कमेंटमधून आपल्याला कळत आहे. विक्रमची ही कमेंट वाचून आथिया प्रचंड भडकली असून तिने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
आथियाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्या आयुष्यात योग्य वेळेवर विश्वास ठेवा असा संदेश देणारा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर विक्रमने कमेंट करताना लिहिले होते की, तू आजकाल खूपच उत्साहित दिसत आहेस... तसेच त्यासोबत चलो केएल चले? क्वालालांपूर असे लिहिले होते. त्याने ही कमेंट लिहिताना राहुलला देखील टॅग केले होते. त्यानंतर तुझी तक्रार मी अम्पायरला करेन... तुझी एकदा विकेट गेली की तुला पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागेल... विक्रमच्या या कमेंटवर सध्या आथिया प्रचंड भडकली असून तिने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने लिहिले आहे की, आता तुलाच ब्लॉक करण्याची वेळ आली आहे.