‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफचा लिपलॉकला इन्कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 18:38 IST2018-09-12T18:37:42+5:302018-09-12T18:38:25+5:30
किमान सहा वर्षांनंतर करण जोहर आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल घेऊन येतोय. पुढील वर्षी रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफचा लिपलॉकला इन्कार?
किमान सहा वर्षांनंतर करण जोहर आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल घेऊन येतोय. पुढील वर्षी रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूलही संपलेय. पण यादरम्यान ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’च्या सेटवरून एक इंटरेस्टिंग बातमी बाहेर आली. होय, टायगरने म्हणे, या चित्रपटात लिपलॉक सीन द्यायला नकार दिलाय. चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाल्यावर टायगरने आपल्या कॉन्ट्रक्टमध्ये ‘नो लिपलॉक क्लॉज’ समाविष्ट केला, असेही सांगितले गेलेय. आता शेवटी खरे काय, हे टायगरचं सांगणार आणि त्याने सांगितलेही. होय, ताज्या मुलाखतीत टायगर यावर बोलला. ‘नो लिपलॉक क्लॉज’बद्दलचे वृत्त निव्वळ एक अफवा आहे. माझे चित्रपट तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला माझ्या प्रत्येक चित्रपटात लिप लॉक सीन्स दिसतील. कथेची मागणी असेल तर असे सीन द्यावेचं लागतात. अभिनेता या नात्याने मी याला नकार देऊ शकत नाही़, असे टायगर म्हणाला. ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत आहेत, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. 2012 मध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी आय हेट लव्ह स्टोरी आणि गोरी तेरे प्यार में सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.