Sidharth-Kiara: काय सांगता! सिड-कियाराचं लग्न OTTवर प्रसारित होणार?, जाणून घ्यायाविष्यी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 15:33 IST2023-02-03T15:26:50+5:302023-02-03T15:33:30+5:30
केएल राहुल आणि आथिया शेट्टीनंतर सिड-कियारा 6 फेब्रुवारीला सातफेरे घेणार आहेत.

Sidharth-Kiara: काय सांगता! सिड-कियाराचं लग्न OTTवर प्रसारित होणार?, जाणून घ्यायाविष्यी
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आता या ग्रँड लग्नाची पाहुण्यांची यादी समोर आली आहे. या लग्नामध्ये फक्त 100-125 पाहुणे यात सहभागी होणार आहेत. याच दरम्यान अशी चर्चा आहे की, सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न OTT वर स्ट्रीम केले जाऊ शकते.
Amazon Prime Videoच्या पोस्टमुळे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची OTT वर स्ट्रीम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर, अॅमझॉन प्राइमने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'शेरशाह' चित्रपटादरम्यानचा सिद्धार्थ आणि कियाराचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या खाली पॅलेसचा फोटोही पोस्ट केला आहे. यानंतर, लग्नाच्या ओटीटी स्ट्रीमिंगचा अंदाज लावला जातोय. रिपोर्टनुसार, ही केवळ OTT प्लॅटफॉर्मवर कौतुक करणारी पोस्ट आहे त्यापेक्षा जास्त काहीच नाही.
विरल भयानी सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्न कव्हर करणार आहे. त्याने त्याच्या पापाराझी हँडलवर पोस्ट शेअर करत लिहिले, 'आम्ही कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे कव्हर करण्यासाठी जैसलमेरला जात आहोत.' त्याचबरोबर लग्नातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी शाहरुख खानचा माजी अंगरक्षक यासिन युगल यांच्याकडे देण्यात आली आहे.
'शेरशाह' चित्रपटात सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसले होते. दोघांची केमिस्ट्री चित्रपटात चांगलीच आवडली आणि खऱ्या आयुष्यातही त्यांची जवळीक वाढू लागली. दोघेही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये सिद्धार्थ आणि कियारा वेगळे आले होते आणि तिथेही त्यांना त्यांच्या लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, पण दोघांनीही मौन बाळगले होते. कियारासोबत आलेल्या शाहिदने मात्र तिच्या लग्नाचे संकेत दिले होतं.