कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:56 IST2025-09-25T16:55:59+5:302025-09-25T16:56:14+5:30
भाईजान सलमान खाननेही Ex गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

कतरिना-विकीने गुडन्यूज दिल्यानंतर सलमानने दिल्या शुभेच्छा? फोटो होतोय व्हायरल
Katrina Kaif Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतीच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तिचे काही फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले होते. अखेर आता कतरिना गरोदर असल्याचं कन्फर्म झालं आहे. कतरिनाने पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. विकी कौशल-कतरिना कैफ आईबाबा होणार असल्याने चाहत्यांचं आनंद गगनात मावत नव्हता. तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाईजान सलमान खाननेही Ex गर्लफ्रेंड कतरिना कैफला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. कतरिनाने सोशल मीडियावर विकीसोबतचा फोटो शेअर करत आईबाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत होता. कतरिनाचा हा फोटो भाईजानने शेअर करत तिचा शुभेच्छा दिल्या असल्याचं पोस्टमध्ये दिसत आहे. एका X युजरने हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये सलमानच्या अकाऊंटवरुन कतरिना-विकीसाठी पोस्ट केल्याचं दिसत आहे.
♥️♥️#SalmanKhanpic.twitter.com/hGHasPguMb
— Harsh. (@harshptl_itz) September 23, 2025
पण, खरं तर सलमानच्या अकाऊंटवर अशी कोणतीही पोस्ट दिसत नाही. त्यामुळे हा फोटोच फेक असल्याचं समजत आहे. दरम्यान, कतरिना वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना बाळाला जन्म देणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर कतरिना कैफ-विकी कौशल आईबाबा होणार आहेत.