रिया चक्रवर्तीला सुशांतचा मृतदेहाजवळ जाण्यासाठी परवानगीच नव्हती, मग शवगृहात पोहचलीच कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:53 IST2020-08-31T17:52:29+5:302020-08-31T17:53:28+5:30
. १५ जून रोजी सूरज ठाकुर आणि एका अन्य व्यक्तीसोबत रिया चक्रवर्ती शवगृहात जाते आणि शवगृहात ४-५ मिनिटे राहून त्यानंतर परत येते. यावरून हे स्पष्ट कूपर हॉस्पिटलवर रियाला शवगृहात पाठवण्यासाठी दबाव आणला गेला असल्याची माहिती समोर येत आहे.

रिया चक्रवर्तीला सुशांतचा मृतदेहाजवळ जाण्यासाठी परवानगीच नव्हती, मग शवगृहात पोहचलीच कशी?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप होत आहेत. नुकतेच सुशांतचा मृतदेह पाहून रियाने ''सॉरी बाबु'' म्हणत सुशांतची माफी मागितल्याचे समोर आले होते. सुशांत सिंह मृत्युप्रकरणावर पहिल्यांदा दिलेल्या मीडिया मुलाखतीमध्ये रियाला यावर प्रश्नही विचारण्यात आला त्यावेळी सुशांतवर मी जीवापाड प्रेम करत होते. त्याच्या मृत्युच्या बातमीने मी उध्वस्त झाले. सुशांतने आत्महत्या केली आणि तो या जगात नाही यावर विश्वाचसच बसत नव्हता.
सुशांत मृतदेह पाहिला नसता तर माझ्या मनावर याचा वाईट परिणाम झाला असता. म्हणून सुशांतचे शेटवचे दर्शन घेतले. त्याच्या पायाला स्पर्श केला आणि ज्या गोष्टीची मला खंत वाटत होती म्हणून मी सुशांतजवळ प्रत्येक गोष्टीसाठी माफी मागितल्याचे स्पष्टीकरण तिने दिले होते.
मात्र आता याबाबतीत आणखीन एक नवीन माहिती समोर येत आहे. रियाला सुशांतचा मृतदेहाजवळ जाण्यासाठी रुग्णालयामार्फतही अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती. परवानगी नसताना रिया सुशांतजवळ कशी गेली यावर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.तसेच जर सोबत पोलीस असतील तर ही परवानगी दिली जाते. रियाला तर अशी कोणतीच परवानगी देण्यात आली नव्हती. रिया सुशांतच्या मृतदेह पाहण्यासाठी रिया सूरज ठाकूर व्यक्तीसह शवगृहात गेली होती.
१५ जून रोजी सूरज ठाकुर आणि एका अन्य व्यक्तीसोबत रिया चक्रवर्ती शवगृहात जाते आणि शवगृहात ४-५ मिनिटे राहून त्यानंतर परत येते. यावरून हे स्पष्ट कूपर हॉस्पिटलवर रियाला शवगृहात पाठवण्यासाठी दबाव आणला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. 8 जून ते 14 जून दरम्यानच्या घटनांबाबत जाणून घेण्यासाठी सीबीआयने रविवारी रियाची तब्बल नऊ तास चौकशी केली. गेल्या 3 दिवसांत रियाची जवळजवळ 26 तास चौकशी केली गेली.