'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:49 IST2025-06-16T11:49:07+5:302025-06-16T11:49:42+5:30

'डॉन ३' (Don 3 Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता प्रेग्नेंसीमुळे कियारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे.

Did Kriti Sanon replace Kiara Advani in 'Don 3'?, the actress's reaction is going viral | 'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

'डॉन ३'मधून कियारा अडवाणीला क्रिती सनॉननं केलं रिप्लेस?, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर(Farhan Akhtar)च्या 'डॉन  ३' (Don 3 Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील स्टारकास्टचीही घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबतकियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता प्रेग्नेंसीमुळे कियारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे. डॉन ३ मध्ये कियारा अडवाणीची जागा एका अभिनेत्रीने घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कियाराऐवजी क्रिती सनॉन (Kriti Sanon) चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. क्रितीच्या रिअ‍ॅक्शनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या प्रतिक्रियेवरून ती चित्रपटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रिती सनॉनने प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले आहे. आता जर क्रिती डॉन ३ मध्ये दिसली तर रणवीर सिंगसोबतची तिची केमिस्ट्री पाहायला मिळेल. लोक डॉनबद्दल खूप उत्सुक आहेत. जेव्हा क्रिती मुंबईतील तिच्या मैत्रिणींसोबत एका कॅफेमधून बाहेर पडत होती तेव्हा पापाराझींनी तिला पोज द्यायला सांगितले. आणि ते म्हणाले की, 'क्रिती जी, डॉन ३, लेडी डॉन, थांबा लेडी डॉन इथे आहे.' हे ऐकताच क्रितीच्या चेहऱ्यावर स्माइल आली. ती काहीही बोलली नाही पण तिच्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना खात्री पटली आहे की ती फरहान अख्तरच्या चित्रपटात दिसणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, क्रिती रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये काम करण्यास तयार आहे. ती लवकरच अधिकृतपणे साइन करणार आहे.


क्रिती सनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 'दो पत्ती' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती. या चित्रपटात काजोल देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसादही दिला होता.

Web Title: Did Kriti Sanon replace Kiara Advani in 'Don 3'?, the actress's reaction is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.