सलमानने 'रेडी'मध्ये कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं? म्हणाली- "तो माझा सिनेमा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:38 IST2025-06-19T15:37:25+5:302025-06-19T15:38:23+5:30

सलमानने रेडी सिनेमात कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला दुःख झालं होतं? १४ वर्षांनी जिनिलियाने केला मोठा खुलासा

Did Genelia deshmukh feel bad because Salman khan didn't cast her in ready movie | सलमानने 'रेडी'मध्ये कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं? म्हणाली- "तो माझा सिनेमा..."

सलमानने 'रेडी'मध्ये कास्ट केलं नाही म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं? म्हणाली- "तो माझा सिनेमा..."

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि सलमान खान यांची चांगली मैत्री आहे. जिनिलिया लवकरच 'सितारे जमीन पर' सिनेमात आमिर खानसोबत दिसणार आहे. या सिनेमातील जिनिलियाच्या भूमिकेची सर्वांना उत्सुकता आहे. यानिमित्त जिनिलिया विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसते. अशातच जिनिलियाने सलमानविषयी एक खुलासा केला आहे. सलमान खानचा सुपरहिट सिनेमा 'रेडी' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात सलमानने कास्ट केलं नाही, म्हणून जिनिलियाला वाईट वाटलं का? याविषयी तिने खुलासा केला आहे.

जिनिलियाने १४ वर्षांनी केला खुलासा

जिनिलियाने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. २०११ साली रिलीज झालेला 'रेडी' हा सिनेमा चांगलाच गाजला. हा सिनेमा 'रेडी' याच नावाच्या तेलुगु सिनेमाचा रिमेक होता. या मूळ सिनेमात जिनिलियाने काम केलं होतं. त्यामुळे  'रेडी' जेव्हा बॉलिवूडमध्ये बनला तेव्हा सलमानने कास्ट न केल्याने जिनिलियाला वाईट वाटलं का? याविषयी विचारलं असता ती म्हणाली, "नाही. जर मला रेडीमध्ये काम मिळालं असतं तर निश्चितच मला आनंद झाला असता. कारण तो माझा सिनेमा होता. परंतु यापुढे सलमान आणि माझा वेगळा सिनेमा येईल, काही सांगता येत नाही."


अशाप्रकारे जिनिलियाने खुलासा केला. जिनिलियाच्या आगामी सिनेमा 'सितारे जमीन पर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ‘सितारे जमीन पर’ सिनेमा उद्या २० जूनला देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात १० नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा विशेष सहभाग आहे. आमिर - जिनिलीया या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Web Title: Did Genelia deshmukh feel bad because Salman khan didn't cast her in ready movie