डायनाला वाटतो डिप्पीचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 12:32 IST2016-08-11T07:02:35+5:302016-08-11T12:32:35+5:30

अभिनेत्री डायना पेंटी हिने ‘कॉकटेल’ चित्रपटात दीपिका पदुकोनसोबत काम केले आहे. चित्रपटात दोघींची टयुनिंग उत्तम जमलेली दाखवली आहे. दीपिकाच्या ...

Diana thinks Deepa's pride | डायनाला वाटतो डिप्पीचा अभिमान

डायनाला वाटतो डिप्पीचा अभिमान

िनेत्री डायना पेंटी हिने ‘कॉकटेल’ चित्रपटात दीपिका पदुकोनसोबत काम केले आहे. चित्रपटात दोघींची टयुनिंग उत्तम जमलेली दाखवली आहे. दीपिकाच्या यशाविषयी बोलताना ती म्हणते,‘ दीपिकाने हॉलीवूडमध्ये ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू केला आहे.

खरंच हे फारच ग्रेट आहे. मला तिचा अभिमान वाटतो. तिने स्वत:च्या पाठीवर थाप देऊन स्वत:चे कौतुक करून घ्यायला हवे. ती ज्या पद्धतीने काम करतेय तिची घौडदौड कोणीही थांबवू शकणार नाही.’ डायना पेंटी ही सध्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ च्या निमित्ताने चर्चेत आहे.

हॅप्पी भाग जायेगी बद्दल बोलताना ती म्हणते,‘ मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मी तिच्या प्रेमातच पडले. चित्रपटाची कथा ही फारच युनिक आहे. कथेतून माझे कॅरेक्टर उलगडवण्याचा मी प्रयत्न नक्की करतेय.’

Web Title: Diana thinks Deepa's pride