दिया मिर्झासोबत लग्न केल्यानंतर वैभव रेखी आणि त्याची पत्नी सुनैना या कारणासाठी आले एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:29 IST2021-04-07T15:25:13+5:302021-04-07T15:29:23+5:30

सुनैनाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती, दिया आणि वैभव समायराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

Dia Mirza, Vaibhav Rekhi and His Ex-wife Get Together for a Special Occasion | दिया मिर्झासोबत लग्न केल्यानंतर वैभव रेखी आणि त्याची पत्नी सुनैना या कारणासाठी आले एकत्र

दिया मिर्झासोबत लग्न केल्यानंतर वैभव रेखी आणि त्याची पत्नी सुनैना या कारणासाठी आले एकत्र

ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुनैनाचे चांगलेच कौतुक नेटिझन्स सोशल मीडियावर करत आहेत. तसेच या तिघांमधील बॉण्डिंगची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दिया मिर्झाने आपला बेबी बम्पसोबतचा सुंदर फोटो पोस्ट करत प्रेग्नेंट असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर दिया हनिमूनवर गेली असता तिथूनच दियाने हा फोटो शेअर केला होता. दिया लग्न झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली होती. दिया हनिमूनला जाताना तिचा पती वैभव रेखीच्या मुलीला सोबत घेऊन गेली होती. त्यामुळे तिचे चांगलेच कौतुक झाले होते. आता तिच्यानंतर वैभवच्या पहिल्या पत्नीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

वैभव आणि दियाचे लग्न झाल्यानंतर वैभवची पहली पत्नी सुनैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दिया ही खूप चांगली मुलगी असल्याचे ती सांगताना दिसत होती. आता दिया, वैभव आणि सुनैना यांचा त्यांच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ते त्यांची मुलगी समायराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

सुनैनाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती, दिया आणि वैभव समायराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुनैनाचे चांगलेच कौतुक नेटिझन्स सोशल मीडियावर करत आहेत. तसेच या तिघांमधील बॉण्डिंगची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे की, समायरा केक कापत असून तिच्यासोबत सुनैना उभी आहे. या व्हिडिओत दिया देखील दिसत असून हा व्हिडिओ शेअर करताना सुनैनाने फॅमिली असे लिहिेले आहे आणि हा व्हिडिओ शेअर करताना दियाला देखील टॅग केले आहे. तिच्या या गोष्टीमुळे सोशल मीडियावर तिचे चांगलेच कौतुक होत आहे. 

Web Title: Dia Mirza, Vaibhav Rekhi and His Ex-wife Get Together for a Special Occasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.